भिमाकोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकासाठी निदर्शने


भिमाकोरेगाव विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकासाठी निदर्शने

पुणे : प्रतिनिधी 3 डिसेंबर ः भिमाकोरेगाव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतिने राहुल डंबाळे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. 

विजयस्तंभ परिसरांत सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा कायम स्वरुपी उभारण्यात याव्यात तसेच सुमारे १०० कोटी रुपयांचा विकास निधी यासाठी राखिव ठेवावा हि मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. 

या आंदोलनात अपर्णा सर्वगोड, विमल कांबळे, अजय लोंढे , बाळासाहेब जाधव, ज्ञानेश्वर बोराटे, नितीन पटेकर, दिपक आवळे , बाळासाहेब मोहिते, राहुल ससाणे, अभिजीत कांबळे ,नितीन इंगळे आदी मान्यवर सहभागी झाले होते.  तरी सदर बातमी आपले लोकप्रिय दैनिकातुन प्रसिध्द होणेस विनंती आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News