जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची विशेष शाळा अभिमान रॅलीचे आयोजन


जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची विशेष शाळा अभिमान रॅलीचे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:


जागतीक दिव्यांग दिना निमिंत स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची शाळा दौण्ड येथील शाळेत सरस्वती देविच्या प्रतिमेची पुजा करुन दिपप्रजोलन करुन रॅलीची सुरवात करण्यात आली,थोर समाजसेवीका मदर तेरेसा यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन श्री.भंडारी सर यांनी मार्गदर्शन करून दिव्यांग दिन साजरा केला.यावेळी विशेष शिक्षक श्री.गणेश हाके,श्री.दिगंबर पवार,कु.सुजाता गायकवाड,कला शिक्षक श्री.दिनेश बत्तीसा,अधिक्षक श्री.वैभव शेलार,लिपिक श्री.विशाल कर्नेवार,परिचारिका सौ,मोनिका गायकवाड,काळजीवाहक श्री.विनोद मराठे,श्री.विक्रम शेलार,श्री.संजय बनसोडे,श्री.संतोष भंडारी सह आदी मान्यवार उपस्थित होते.यावेळी श्री.पवार दिगंबर यांनी मनोगत व्यक्त केले अंतरराष्ट्रिय पातळीवर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येत असताना दिव्यांगांना आधार म्हणून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अहोरात्र दिव्यांगांसाठी झटणा-या व्यक्तींचाही दिव्यांग दिनी उल्लेख करावासा वाटतो, अनेक समाजसेवक हे दिव्यांग व्यक्ती साठी काम करत असतात व दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  कार्यरत असतात या पैकी दिव्यांगांचे एका हाकेला साद घालणारे असंख्य समाजसेवक काम करत आहेत त्यांचे या दिनी आवर्जून नाव घेतले जाते दिव्यांगांचे जीवनमान बदलुन त्यांना त्यांचे हक्क व आधिकार मिळवुन देण्याचा विडा उचललेले असंख्य कार्यकर्ते काम करत आहेत. दिव्यांगांसाठी अविरत झटावे सेवा करावी व जगात आपली एक नवी ओळख काही तरुणांने निर्माण केली आहे,त्यात कै.श्रीकुष्ण भंडारी यांचे नाव अवर्जुन घ्यावे लागते,त्यांचे विषयी बोलावे तितके थोडे आहे असे समाजासाठी व दिव्यांगांसाठी महान कार्य करणाऱ्याना व दिव्यांगाना,आपली निस्वार्थ भावनेने सुरू असलेली दिव्यांग सेवा अविरत सुरू राहो,  हीच दिव्यांग दिनी आपणांस शुभेच्छा देण्यात आल्या, या कार्यक्रमाचे आभार श्री.दिनेश बत्तीसा यांनी मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News