अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाहपदी विक्रम राठोड यांची फेर निवड


अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाहपदी विक्रम राठोड यांची फेर निवड

जिल्हा वाचनालयाच्या  प्रा.शिरिष मोडक यांची अध्यक्षपदी तर प्रमुख कार्यवाहपदी विक्रम राठोड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नूतन उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, खजिनदार तन्वीर खान, सहकार्यवाह डॉ.राजा ठाकूर, निमंत्रित सदस्य कवी चंद्रकांत पालवे, गणेश अष्टेकर, संचालक अजित रेखी, किरण आगरवाल, प्रा.मेधा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, संजय चोपडा, अनिल लोखंडे, राहुल तांबोळी, डॉ.शैलेंद्र पाटणकर, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल आदि. (छाया : सुरेश मैड)

वाचनालयाच्या माध्यमातून सरस्वतीमातेची सेवा - प्रा.मोडक

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - वाचन संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा पुढे चालवितांना साक्षत सरस्वतीची सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याची भावना अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे नूतन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी व्यक्त केली.

      नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत प्रा.शिरिष मोडक यांची अध्यक्षपदी तर प्रमुख कार्यवाहपदी विक्रम राठोड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी दिलीप पांढरे व अनंत देसाई, खजिनदार तन्वीर खान, सहकार्यवाह डॉ.राजा ठाकूर, तर निमंत्रित सदस्य म्हणून कवी चंद्रकांत पालवे व गणेश अष्टेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन संचालक अजित रेखी, किरण आगरवाल, प्रा.मेधा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, संजय चोपडा, अनिल लोखंडे, राहुल तांबोळी, डॉ.शैलेंद्र पाटणकर, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व संचालक मंडळाचा ग्रंथपाल अमोल इथापे व कर्मचारी वृंदांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News