ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणा मुळे srpf चे जवान भारत भोई यांचा अपघाती मृत्यू,ट्रॅक्टर चालक वाहन सोडून फरार


ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणा मुळे srpf चे जवान भारत भोई यांचा अपघाती मृत्यू,ट्रॅक्टर चालक वाहन सोडून फरार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: दौंड कुरकुंभ बारामती रस्त्यावर गट हजेरी लावून घरी जात असलेल्या जवानाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली आहे,राज्य राखीव पोलीस गट 7 चे सहायक फौजदार भारत बजरंग बोबडे यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे अपघाताची फिर्याद दाखल केली आहे, त्यामध्ये दिनांक 2/12/21 रोजी सायंकाळी 6:30 वाजताचे सुमारास आमच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 गटची हजेरी संपल्यावर आमचे सर्व जवान घरी निघतात,त्यातील एक जवान भारत अजिनाथ भोई वय 31 हे आपली बजाज मोटरसायकल क्रमांक MH-42 -AM -1745 वरून घराकडे जाण्यासाठी दौंड कुरकुंभ बारामती रस्त्यावर आले असता अष्टविनायक मंगलकार्यालय समोर त्याच रस्त्याने पुढे उसाने भरलेला दोन ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर क्रमांक MH-12-GN-6532,ट्रॉली क्रमांक MH-12-GN-7119आणि MH-12-GN-7120 चालला होता, त्या ट्रॅक्टर चालकाने अगोदर ट्रॅक्टर उजव्या बाजूला घेऊन पुन्हा लगेच डाव्या बाजूला घेतला त्यामुळे पाठीमागून ट्रॅक्टर जवळून जाणारे भारत भोई यांना ट्रॉलीचा धक्का बसला आणि ते मागच्या ट्रॉली च्या चाकाखाली पडले आणि त्यांच्या डोक्यावरून दोन्ही चाके गेल्या मुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे,ट्रॅक्टर  चालक ट्रॅक्टर जागेवरच सोडून पळून गेला आहे,सहायक फौजदार भारत बोबडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकावर भाग 5 गुन्हा रजिस्टर नं 605/2021 भा द वि कलम 279,304 (अ),338,427मो.वा का 184,134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News