साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ. आशुतोष काळे,व विश्वस्त मंडळ,आज स्वीकारणार पदभार!


साईबाबा संस्थानचे  नूतन अध्यक्ष आ. आशुतोष काळे,व  विश्वस्त मंडळ,आज  स्वीकारणार पदभार!

शिर्डी,राजेंद्र दूनबळे:  शेवटी न्याय व्यवस्थेच्या निकाला नंतर

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानवर राज्य शासनाने नेमलेले नवीन विश्वस्त मंडळ हे  शिर्डी साई संस्थानवाच्या बॉडीवर  आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षते खाली आज शुक्रवार सकाळी सहा वाजता श्री साईबाबांचे दर्शन घेऊन साई संस्थांनचा पदभार स्वीकारणार आहे. बऱ्याच दिवसापासून नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक झाली होती मात्र न्यायालयाची परवानगी नसल्या कारणाने पदभार   स्विकारता येत नव्हते , न्यायालयाने परवानगी देताच विस्वस्त मंडळ हे आज पदभार स्वीकारणार  आहे अधिकृत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्री साईबाबा संस्थान वर आमदार‌ आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने नवीन विश्वस्त मंडळ काही दिवसांपूर्वी नेमले होते ‌.मात्र उच्च न्यायालयाने या नवीन विश्वस्त मंडळाला संस्थांनचा पदभार स्वीकारण्यास अपुरी संख्या असल्यामुळे मनाई केली होती व तदर्थ समिति कारभार पाहिल असे आदेश जारी केले होते. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती व या याचिकेवर नुकतीच सुनावणी होऊन राज्य शासनाने नेमलेल्या या नवीन विश्वस्त मंडळाला साई संस्थांनचा दैनंदिन कारभार पाहण्यास संमती देण्यात आली आहे .त्यामुळे हे नवीन विश्वस्त मंडळ उद्या शुक्रवारी सकाळी सहा वाजता संस्थांनचे नूतन अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थानचा पदभार स्वीकारणार आहे.शिर्डीतील विकसनशील कामाला आता गती मिळणार व साईभक्तांच्या समस्या दूर होणार असे सर्व नागरिकांमध्ये सूर आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News