गुजरात मधील हेल्मेट गँग नगर पोलीसांनी शिताफीने केली अटक!! कोतवाली व तोफखाना पोलिसांची संयुक्त कारवाई


गुजरात मधील हेल्मेट गँग नगर पोलीसांनी शिताफीने केली अटक!! कोतवाली व तोफखाना पोलिसांची संयुक्त कारवाई

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) गुजरातमधील चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या नगरच्या पोलिसांनी सोमवारी आवळल्या. अगदी सिनेस्टाईल कारवाई करीत तोफखाना व कोतवाली पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत या दरोडेखोरांना जेरबंद केले. कोतवाली व तोफखाना पोलिसांनी नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा बँकेच्या जवळ असणाऱ्या एचडीएफसीच्या बँकेत पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने सिनेस्टाइल कारवाई करत गुजरातमधील सहा आरोपींना रंगेहात पकडले.

        पकडलेल्या आरोपीमध्ये जिलेश दिनेश घासी (वय ४२, राहगार छरानगर गरीब दास चाळी, फ्री कॉलनी, रेल्वे स्टेशन अहमदाबाद), अजय उत्तम माचरेकर (वय ४५ वर्ष, राहणार घरानगर नवखुली, कुबेर नगर अहमदाबाद गुजरात), राकेश बन्सी बंगाली (वय ४५, राहणार कुबेर नगर अहमदाबाद), दीपक मिसभाऊ इन्द्रेकर (वय ३०, राहणार सरदार नगर, अहमदाबाद), मयूर दिनेश बजरंगे (वय ३३, राहणार सरदार ग्राम रेल्वे स्टेशन जवळ, अहमदाबाद), राजेश हरिभाई टमायेचे (वय ४९ राहणार कुबेर नगर, सरदारग्राम रेल्वे स्टेशन जवळ अहमदाबाद गुजरात ) यांचा समावेश आहे. मागील महिन्यामध्ये नगर शहरामध्ये तोफखाना व कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये अनेक चोऱ्या झाल्या आहेत.

बँकेतून पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून लूटमार करणारी टोळी कार्यरत झालेली होती. या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलीसानी विविध ठिकाणी चार ते पाच पथके पाठवलेली होती. तपासाच्या अनुषंगाने काही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. ही टोळीही परराज्यातील

असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.तोफखाना व कोतवाली पोलिसाना हे चोरटे नगर शहारामध्ये आले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार रात्रीपासूनच त्या आरोपींचा शोध सुरू झाला होता, स्टेशन रोडवरील एचडीएफसी बँकेच्या आवारामध्ये हे चोरटे आले असल्याचे समजल्यानंतर तोफखाना व कोतवाली पोलीस साध्या गणवेशात तीनजण बँकेच्या आवारामध्ये थांबलेले होते व बाहेरच्या बाजूला पोलीस दबा धरून होते. सकाळी साडेदहाच्या सुमाराला बैंक सुरू झाल्यानंतर चोरट्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आतमध्ये असलेल्या तीन पोलिसांनी बँकेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने चौघांना पकडून ठेवले व बाहेर दोनजण होते. त्यांना सुद्धा पोलिसांनी पकडले,या चोरट्यांकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या.या गाड्या त्यांनी चोरून आणल्या असाव्यात अशी शक्यता आहे. अटक केलेले सर्व आरोपी गुजरातमधील आहेत. या प्रकरणात कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये वरील आरोपीच्याविरुद्ध चोरीचा व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News