गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा पक्ष एकच असू शकत नाही - प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे


गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा पक्ष एकच असू शकत नाही - प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे

अहमदनगर: राजकरण हे दलित, कष्टकरी, कामगार आणि महिला यांचा उध्दार करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे त्यामूळे या घटकातील लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करू नये. मात्र, गुलाम आणि गुलाम करणाऱ्यांचा पक्ष एकच असू शकत नाही याचे भान ठेऊन दलित आदिवासी समाजाने प्रस्थापित राजकीय पक्षापासून दूर राहिले पाहिजे" असे परखड विचार प्रा डॉ मच्छिंद्र सकटे यांनी मांडले ते अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यां च्या बैठकीत बोलत होते.अध्यक्षस्थानी दलित महासंघाचे नेते काशिनाथ सुलाखे पाटील होते.

      डॉ मच्छिंद्र सकटे पुढे म्हणाले की," ज्या व्यवस्थेने आपल्याला गुलाम केले आहे त्या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे."

     आपल्या अध्यक्षीय भाषणात काशिनाथ सुलाखे पाटील म्हणाले," उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी मध्ये बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखऊन दिली पाहिजे"

      बहुजन समता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये  श्रीगोंदा, पारनेर,कर्जत, पाथर्डी, संगमनेर, जामखेड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठक यशस्वी करण्यासाठी बहुजन समता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी बुलाखे तसेच, प्रवीण शेंडगे, पवन कुचेकर, श्रीकांत साठे, सूरज कनिंगध्वज, अनिल उमप, मधुकर उकिरडे, शरद गाडेकर, प्रकाश रणशिंग,राहुल पवार, गणेश जगधने, मंगल अल्हाट, दिपाली उमप, मंगल पठारे, पुष्पलता शेंडगे, सय्यद मॅडम आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक शिवाजी बुलाखे यांनी केले. प्रवीण शेंडगे यांनी आभार मानले तर राम पाटोळे यांनी सूत्रसंचलन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News