बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने युपीएससी मधील गुणवंत युवकांचा गौरव


बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने  युपीएससी मधील गुणवंत युवकांचा गौरव

आत्मविश्‍वास व ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी असल्यास यश निश्‍चित -जालिंदर बोरुडे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- यु.पी.एस.सी.द्वारे निवड झालेल्या जिल्ह्यातील सुरज गुंजाळ, सुहास गाडे, विनायक नरवडे, राकेश अकोलकर, विकास पालवे या युवकांचा बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ व फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने  गौरव करण्यात आला.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी यु.पी.एस.सी. मध्ये चमकलेल्या जिल्ह्यातील युवकांचा सत्कार केला. यावेळी वैभव दानवे, बाबा धीवर, रतन तुपविहीरे आदी उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे म्हणाले की, ग्रामीण भागाचा न्यूनगंड न बाळगता जिल्ह्यातील युवक युपीएससी मध्ये चमकले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या युवकांसाठी यश संपादन करणारे हे युवक रोल मॉडेल आहेत. आत्मविश्‍वास व ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करण्याची तयारी असल्यास यश निश्‍चित मिळते. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी आपली गुणवत्ता सिध्द करुन इतरांसाठी प्रेरणा बनले असल्याचे सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News