पुण्यातील धायरी येथे सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गांचा सन्मान व क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न


पुण्यातील धायरी येथे सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गांचा सन्मान  व क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न

पुणे- धायरी येथील प्रथम महिला  सरपंच, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, पुण्याच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या माजी अध्यक्षा सुरेखा दमिष्टे यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त 15 ऑक्टोबर 2021 रोजी नवदुर्गांचा सन्मान व  क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे  आयोजन पुण्यातील धायरीतील पासोडी येथील सूर्यगंगा सोसायटी येथे करण्यात आले होते.  या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  उपाध्यक्षा स्वाती पोकळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्षा सुनिता डांगे,प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंगनाना चव्हाण,भावना पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रभावती भुमकर, तृप्ती पोकळे, माजी  जिल्हा परिषद सदस्या व धायरी च्या प्रथम माजी सरपंच सुरेखा दमिष्टे,संदीप पोकळे,दशरथ मनेरे, विकास कामठे, सुशांत पोकळे , शिवसेनेच्या खडकवासला मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख नितीन वाघ, आनंद मते,सचिन पोकळे,  खडकवासल्याचे माजी सरपंच विजय कोल्हे, नितीन वाघ, महेंद्र भोसले ,प्रतीक पोकळे, शोभा पोकळे, सुलभा जरांडे, राजेशाही हॉटेलचे संचालक निलेश दमिष्टे  , रुपेश दमिष्टे, वैशाली दमिष्टे, श्वेता खेडेकर, सारिका पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.यावेळी संध्या गिरमे ,शकुंतला मुरुडकर, सोनाबाई  ढेबे, सुलभा झरांडे ,रुपाली बनकर ,कमल  बेलकर, मंगल मेंगडे, सारिका पोकळे, जाई काळभोर ,अर्चना पाटील, सुरवंता करडे या नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


  प्रसिद्ध निवेदक आर जे अक्षय यांचा क्षण आनंदाचा, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन खास महिलांसाठी करण्यात आले होते. यामध्ये विविध गीतांवर कलाकारांनी नृत्य व गायन सादर केले. या खेळ पैठणीचा कार्यक्रमांमध्ये दिपाली लोणारे या पैठणी साडीच्या विजेत्या ठरल्या . द्वितीय विजेत्यां प्रतिभा वेताळ यांना  सोन्याची नथ व तृतीय विजेत्या सुनंदा थोपटे यांना चांदीचे पैजण  देण्यात आले. कार्यक्रमातील  उत्तेजनार्थ महिलांना दहा बक्षिसे ठेवण्यात आली होती.  या कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच राजकीय क्षेत्रातील महिलांनीही काही काळ या  महिलांमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमास धायरी मधील महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धायरीच्या प्रथम माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद  सदस्या सुरेखा दमिष्टे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सुर्यगंगा सोसायटीतील सर्व लहान थोर मंडळी व धायरी ग्रामस्थ उपस्थित होते .कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व शासकीय नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News