ऐन सणासुदीला दौंड शहरात जबरी दरोडा,श्वान पथकाला पाचारण, अप्पर पो अधि मिलिंद मोहिते यांची घटनास्थळी भेट


ऐन सणासुदीला दौंड शहरात जबरी दरोडा,श्वान पथकाला पाचारण, अप्पर पो अधि मिलिंद मोहिते यांची घटनास्थळी भेट

विठ्ठल होले विशेष   प्रतिनिधी : दौंड शहरातील गोपाळवाडी परिसरात ऐन सणासुदीच्या काळात जबरी दरोडा टाकला आहे, यामध्ये दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाला मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे,त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन cctv फुटेज तपासून योग्य त्या सूचना केल्या आहेत,दौंड परिसरातील भवानी नगर,शिवराज नगर,गजानन सोसायटी,सरपंच वस्ती याठिकाणी दरोडेखोरांनी रात्री दोन वाजल्यापासून पहाटे पर्यंत धुमाकूळ घालत, मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, यामध्ये गजानन सोसायटी येथे राहणाऱ्या वनिता तुपेकर यांच्या बेडरूम मध्ये रात्री दोन वाजता  त्यांच्या घराचा दरवाजा कटवणी ने उचकटून  पाच जणांना घरात प्रवेश केला, त्या मायलेकीनी आरडाओरडा केल्यामुळे जे हाताला मिळेल ते ओरबडून त्यांनी पळ काढला, त्यांनी फिर्यादी मध्ये म्हटले आहे की 45000 रुपये किमतीची दीड तोळे वजनाची चैन,आईच्या कानातील अर्धा तोळे वजनाची 15000 रुपयाची फुले,दोन हजार रुपये रोख असा ऐवज चोरीला गेल्याचे सांगितले, तर पुढे तीन वाजता सरपंच वस्ती येथील किशोर ढमे यांच्या घरावर हल्ला चढवला त्यामध्ये दोन तोळ्यांचे गंठण,अर्ध्या तोळ्यांचे आक्कासाहेब डोरले,1500 रुपये रोख, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असे 77500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत, पहाटे 3:30 वाजता दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो नाईक अण्णासो देशमुख यांच्या घरावर चोरट्यांनी हल्ला चढवला, त्यांना काही कळायच्या  आत त्यांच्या समोर त्यांच्या बेडरूममध्ये अनोळखी पाच व्यक्ती दिसले,देशमुख  हे जागे होताच चोरट्या मधील सॅडो बनियन आणि काळी पॅन्ट घातलेल्या व्यक्तीने देशमुख यांच्या छातीवर बसून त्यांच्या तोंडावर हातातील रॉड मारून जखमी केले,एकाने हिंदीतून विचारले जो कुछ है सब हमारे हवाले करदो, त्यावर देशमुख यांनी तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या पण आम्हाला मारू नका,त्यावेळी एका चोरट्याने कपाटातील 70000 रुपये रोख,45000 रुपये किमतीचे गंठन,15000 रुपयांची कर्णफुले, लहान मुलाच्या पायातील चांदीचे तोडे असा एकूण 133000 रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे, या सर्व जबरी चोरीमुळे बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली आहे,श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते,सदर पाच अज्ञात आरोपी विरोधात दौंड पोलीस ठाण्यात भा द वि कलम 395,397 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या दरोड्याचा तपास युद्धपातळीवर सुरू झाला आहे, या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत,आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांनी सांगितले आहे,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आसपासच्या ग्राम सुरक्षा दल,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News