करमाळा इंदापूर या दोन तालुक्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड,माजी सरपंच देविदास साळुंके यांचे निवेदन


करमाळा इंदापूर या दोन तालुक्याला जोडणारा ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड,माजी सरपंच देविदास साळुंके यांचे निवेदन

विठ्ठल होले विशेष   प्रतिनिधी : -


सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ या दोन गावांना जोडणारा ब्रिटिश कालीन पूल धोकादायक ठरू शकतो, या पुलाला मोठे भगदाड पडले आहे, त्या संदर्भात कोंढार चिंचोली गावचे माजी सरपंच देविदास साळुंके यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले आहे,निवेदनात साळुंके यांनी म्हटले आहे की सदर रस्त्यावर वाहतुकीची सतत वर्दळ असते, या पुलाच्या पूर्वेकडील बाजूस मोठे भगदाड पडले आहे, याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, तसेच ब्रिटिश कालीन पूल ढासळला तर तो हळू हळू नामशेष होईल,सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे,काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यावर मुरूम टाकून बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे,तरी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे की कोणताही अनर्थ होण्याची वाट पाहू नये,आमच्या निवेदनाची दखल घेऊन या पुलाची डागडुजी करून अपघात होण्यापासून टाळावे,तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिकेटस बसविण्यात यावेत,फक्त पिकप गाडी जाईल अशी व्यवस्था करून जड वाहतूक पूर्णपणे बंद करून लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व पुलाची वयोमर्यादा वाढावी या दृष्टीने लवकरात लवकर काम सुरु करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे,हे निवेदन माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, तहसील कार्यालय करमाळा,मुख्य अभियंता पुणे प्रादेशिक  सा बा विभाग पुणे,अधीक्षक अभियंता सा बा मंडळ सोलापूर,कार्यकारी अभियंता सा बा विभाग अकलूज,पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,पोलीस निरीक्षक करमाळा यांना दिले असल्याचे माजी सरपंच देविदास साळुंके यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News