अभाविप चंद्रपूर जिल्हा चे दोन दिवसीय अभ्यास वर्ग बल्लारपूर येथे संपन्न


अभाविप चंद्रपूर जिल्हा चे दोन दिवसीय अभ्यास वर्ग बल्लारपूर येथे संपन्न

चंद्रपूर :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर जिल्हाचा जिल्हा अभ्यास वर्ग हा बल्लारपूर येथे दिनांक २ व ३ ऑक्टोंबरल संपन्न झाला. या मध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांना अभाविप बद्दल कार्य बद्दल प्रशिक्षण व एकंदरीत विद्यार्थी हीतैशी व शैक्षणिक परिवार संकल्पनेतून राष्ट्राभिमान याची प्रचिती अभ्यास वर्गात यात विविध दहा सत्र घेण्यात आले. वर्षभरातील कार्याची प्रदर्षणी उद्घाटन माउंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर चे प्राचार्य श्री. शैलेश झाडे,जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, नगर मंत्री आदित्य दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. व अभ्यास वर्ग सत्रचे उद्घाटन जिल्हा संघचालक तुषार जी देवपुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी संघटनमंत्री अमित पटले, वर्ग प्रमुख जयेश भडघरे यांची उपस्थिती होती. या अभ्यास वर्ग मध्ये विविध विषयांसाठी मान्यवर वक्त्यांची मार्गदर्शन लाभले यात समांतर सत्र व व्यवहारिक सत्र पण होते. यावेळी प्रांत संघटन मंत्री विक्रमजितजी कलाने, विभाग संघटन मंत्री शक्तीजी केराम,ईशांत जी आकांत हे पूर्णवेळ उपस्थित होते. 

यावेळी *जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले यांनी  चंद्रपूर जिल्हाची नूतन अभाविप जिल्हा समिती सत्र 2021-22 करिता घोषणा करण्यात आली.* यामध्ये जिल्हा सह-संयोजक- आशुतोष द्विवेदी

वरोरा भद्रावती भाग संयोजक - जयेश भडघरे

गडचंदुर -जिवती भाग संयोजक- प्रदीप तिवारी

जिल्हा आयाम प्रमुख - शैलेश दिंडेवार

जिल्हा सोशल मीडिया व प्रेस प्रमुख - शकील शेख

जनसंपर्क व अर्थ प्रमुख- गणेश नक्षिणे

जिल्हा समिती सदस्य - तिरुपती जाधव, अविनाश बागडे, तरुण शर्मा, अंजली सिंह बैस, भाग्यश्री नागपुरे,यश चौधरी, तनुजा येरणे, सानिया पठाण, प्रा. डॉ.पंकजजी काकडे, अमीतजी पटले यांची घोषणा करण्यात आली. तसेच या जिल्हा समिती मध्ये सर्व  प्रदेश कार्यकारीणी सदस्य, सर्व शाखांचे नगरमंत्री अपेक्षित राहणार आहे.  विशेष निमंत्रित सदस्य म्हणून प्रा.योगेशजी येनारकर, प्रा.धर्मेंद्रजी मुनघाटे, शक्तीजी केराम यांची घोषणा करण्यात आली.यावेळी प्रांत संघटन मंत्री श्री. विक्रमजित कलाने, विभाग संघटन मंत्री शक्तीजी केराम,संघटन मंत्री अमितजी पटले यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन दिवसीय अभ्यास वर्गाला ७२ विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक कार्यकर्ता यांची उपस्थिती होती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News