दौंड शहरात तरुणीचा विनयभंग, छेडछाड करणाऱ्या तरुणाला अटक,रोडरोमिओवर कारवाईची मागणी


दौंड शहरात तरुणीचा विनयभंग, छेडछाड करणाऱ्या तरुणाला अटक,रोडरोमिओवर कारवाईची मागणी

विठ्ठल होले विशेष, प्रतिनिधी :दौंड शहरात कामावर गेलेल्या तरूणीला तिच्या कामावर जाऊन तिला त्रास देणाऱ्या तरुणाला दौंड पोलिसांनी अटक केली आहे, शहरातील भीम नगर परिसरात राहणाऱ्या मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास दौंड पोलिसांनी अटक केली. राजेश उर्फ राजू नारायण गायकवाड (रा. दौंड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहिती नुसार, आरोपीने सदर तरुणीला,मी तुझ्यासाठी येथे आलो आहे, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिचा हात पकडला व मनात लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणु केली. त्यावेळी फिर्यादीने त्याचा हात झटकत मला तुझ्याशी बोलायचे नाही असे म्हणाली असता आरोपीने तिला शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने दौंड पोलिसांकडे तक्रार केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. सध्या दौंड शहरांमध्ये रोड रोमिओ चा सुळसुळाट झाला असून, हे रोमिओ आपल्या दुचाकीवर दोघा, तिघांना बसवून जोरजोरात हॉर्न वाजवीत शहरातील रस्त्यांवरून बेफाम वेगात वाहने पळवीत असतात,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून बऱ्याच प्रमाणात शिस्त लागली आहे,रस्त्यावरील अतिक्रमण, बेशिस्तपणा,अवैध वाहतूक,अवैध धंदे अशा सर्वच क्षेत्रात लोकांना सुतासारखे सरळ केले आहे,आता या कर्कश हॉर्न,फॅनशी नंबर प्लेट,ट्रिपल सीट जोरात गाडी चालवणारे अशांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News