रेल्वे पेंशनर्सचे 9 वे वार्षिक अधिवेशन उत्साहात साजरे,शरीरात श्वास असे पर्यंत लढा देणार जी के गाडीलकर


रेल्वे पेंशनर्सचे 9 वे वार्षिक अधिवेशन उत्साहात साजरे,शरीरात श्वास असे पर्यंत लढा देणार जी के गाडीलकर

विठ्ठल होले विशेष   प्रतिनिधी : दौंड रेल्वे रिटायर पेंशनर्सचे 9 वे वार्षिक अधिवेशन दौंड पेंशनर्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून उत्साहात संपन्न झाले,सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करून दौंड मध्ये सभा संपन्न झाली,या सभेसाठी मुंबई येथून रेल्वे रिटायरीज सोशन वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अनवर बापे आणि त्यांचे सहकारी कुरबेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,सभेची सुरवात दीपप्रज्वलन करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली,कोरोना काळात मृत्यू पावलेल्या सहकार्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच 80 वर्षावरील सर्व जेष्ठ पेंशनर्सचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, संस्थेचे सचिव जी के गाडीलकर यांनी सन 2020-2021 चा अहवाल सादर केला, यावेळी गाडीलकर यांनी जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत सर्वांसाठी लढत राहील,तर कोषाध्यक्ष सी के गाडीलकर यांनी ऑडिट केलेला जमाखर्च सादर केला त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले,

यावेळी प्रमुख पाहुणे बापे मुंबई, कुलकर्णी गुलबर्गा, सोमवंशी महाराष्ट्र राज्य सेवा निवृत्त संघटना सचिव,काका कावळे,वाघाडे,शिशुविकास शाळेचे सचिव शामराव वाघमारे या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी बापे यांनी पेंशनर्स यांनी विचालेल्या प्रश्नांची उत्तरे दिली,पेंशनर्सना येणाऱ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या,या कार्यक्रमासाठी पदाधिकारी चतुर्वेदी, महेश कांबळे, तिवारी, काकडे, सालोमन अबनिस,विवेक संसारे,कुमारी शकुंतला, लक्ष्मण होले, मलेश नागारेड्डी, पार्वतीबाई होसमणी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, संस्थेचे अध्यक्ष शुक्ला यांनी अध्यक्षीय भाषण केले, त्यांनी पुढील वर्षाची कार्यकारिणी जाहीर केली, एस जे भोसले यांनी सर्वांचे आभार मानले, या कार्यक्रमाला सेवा निवृत्त कर्मचारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, जेवणासह झालेल्या या मिटिंगची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News