फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक संपत शिंदे यांचा सत्कार


फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक संपत शिंदे यांचा सत्कार

सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वंचित घटकांना मदत -संपद शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बोरुडे, संजय सावंत, ओम बोरुडे उपस्थित होते. 

राजेंद्र बोरुडे यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. जालिंदर बोरुडे यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करताना पोलिस दलाचे नेहमीच सहकार्य मिळत असते. पोलिस हा खाकी वर्दीतला एक समाजसेवक असून, मनुष्याच्या प्रत्येक संकटात धावून जाणारा खरा मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिस निरीक्षक संपद शिंदे यांनी फिनिक्स सोशल फाऊंडेशनने दुर्बल घटकांसाठी सुरु केलेली मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराची चळवळ आधार ठरत आहे. सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे वंचित घटकांना मदत होत असून, जालिंदर बोरुडे यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान व अवयवदान चळवळीत सुरु केलेले कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News