रेल्वेस्टेशन परिसरातील सोळा दिवसाच्या बालिकेचे अपहरण


रेल्वेस्टेशन परिसरातील सोळा दिवसाच्या बालिकेचे अपहरण

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) आईच्या कुशीत झोपलेल्या सोळा दिवसाच्या नवजात बालिकेचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले ही घटना सोमवारी दिनांक 20 रात्री अकरा ते दिनांक 21 पहाटेच्या दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की सुनील कपिले ( राहणार जिजामाता चौक तालुका श्रीरामपूर अहमदनगर ) हे त्यांच्या पत्नीसह उपजीविका करण्यासाठी नगर मध्ये आले कामानिमित्त ते रेल्वे वसाहतीजवळील नवीन बांधकाम सुरू असलेल्या साइटवर रेल्वे स्टेशन येथे राहतात. सोमवार दिनांक 20 रोजी नेहमीप्रमाणे ते घरात झोपलेले असताना रात्री अकरा ते मंगळवार दिनांक 21 च्या पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांची सोळा दिवसाची मुलगी श्रावणी हिस चोरून पळवून नेले.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुनिता कपिले यांच्या फिर्यादीवरून भा द वि कलम 363 प्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केले अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहे.

 अपहरत मुलगीचा रंग गोरा, चेहरा उभट, अंगात पिवळ्या रंगाचे कपडे व कानटोपी घातलेली आहे. या मुलीची माहिती कोणाला मिळाल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नं ०२४१ २४१६११७ तसेच पोलिस उप निरीक्षक मनोज महाजन मोबाईल नंबर ८६५२११६७६७  या फोनवर संपर्क करावा असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News