पुणे अहमदनगर हवेने कामरगाव चास शिवारामध्ये सहा लाख 70 हजार किमतीचे गोंमास व वाहतूक करणारा टेम्पो पकडला-नगर तालुका पोलिसांची कामगिरी


पुणे अहमदनगर हवेने कामरगाव चास शिवारामध्ये सहा लाख 70 हजार किमतीचे गोंमास व वाहतूक करणारा टेम्पो पकडला-नगर तालुका पोलिसांची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीची गस्त घालत असताना नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना एक संशयित टेम्पो जात असताना आढळला त्यांनी लगेच त्याचा पाठलाग सुरू केला तत्पूर्वी तो टेम्पो पुणे-अहमदनगर हवेने कामरगाव-चास शिवारामध्ये पोहोचला होता त्या टेम्पो मध्ये 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे जातीचे जनावराचे मांस जप्त करण्यात आले व महिंद्रा कंपनीची पिकप चार चाकी गाडी किंमत 4 लाख किमतीचे ती जप्त करण्यात आली असा एकूण सहा लाख 70 हजार किमतीचे एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी टेम्पो चालक किरण पांडुरंग कुंभार राहणार शिंदेवाडी देशमुख वाडी ता माळशिरस जिल्हा सोलापूर हा गोमास जातीचे मास अवैधरित्या त्याच्या पिकप गाडी मध्ये घेऊन जात असताना त्याला पकडणे असता त्याने प्रथम त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन लागला. परंतु नगर तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्याला अधिक विश्वास मध्ये घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरचे गोमास नगर शहरांमधील अरबाज गुलाम रसूल कुरेशी  राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट ता जि अहमदनगर यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा विधेयक 1995 चे कलम 5 (क)4 चे उल्लंघन 8 व 9,9 (अ) प्रमाणे वगैरे मजकुराचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक व गोमास मालक यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई श्री मनोज पाटील साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक इथापे  व पोना/धर्मराज  दहिफळे व ठाणे अंमलदार यांनी केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News