कोपरगाव शहराला स्वच्छ पिण्याचे पाणी रोज किंवा पिवसाआड नगरपालिका कधी देणार ? - माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा नगरपालिकेला सवाल !!


कोपरगाव शहराला स्वच्छ पिण्याचे पाणी रोज किंवा पिवसाआड नगरपालिका कधी देणार ? - माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा नगरपालिकेला सवाल !!

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

          कोपरगाव  शहरातील नागरीकांना स्वच्छ पिण्याचे पाणी नाही दररोज तर दिवसाआड का होईना नगरपालिका कधी देणार ? असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना केला आहे.

       शहरालगत जी उपनगरे अगदी शहराला खेटून जोडलेली आहे त्यांच्या पाण्याचा प्रश्न नगरपालिका कधी सोडणार ?? विशेष करून कोपरगावच्या हद्दी लगतच्या जेऊर पाटोदाचा काही भाग ? ? ?

       शहरातील नवीन 28 रस्त्यांचे कामे चालू करण्यापूर्वी रस्त्याच्या खाली, बाजुला किंवा साईडपट्टीमध्ये जर नवीन पाईप लाईन टाकलेली असेल तर त्या पाईपलाईनची पाणी चालू करून टेस्टिंग (ट्रायल) घेतली का ? जर ट्रायल घेतली नसेल तर कामे चालू करण्या आगोदर घ्यावी आणि नंतर नवीन रस्त्यांच्या कामांना सुरुवात करावी जेणेकरून पाईप लाईनसाठी नवीन झालेले रस्ते फोडण्याची गरज राहणार नाही.

  आजही पावसाळ्यात नगरपालिकेला नागरीकांना पिण्याचे पाणी आठ दिवसाआड देते, तेही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छ, गढुळ, कमी दाबाने आणि लाईट गेली तर पाणीच भरून मिळत नाही अशी वस्तुस्थिती आहे..... यामुळे लहान मुलापासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांना पोटाचे विकार चालू असून खऱ्या अर्थाने महिला -भगिनींचे खूप हाल व कसरत होते. तसेच पाणी साठवण्यासाठी टाक्या, कळश्या, डबे ठेवायलाही गरीब, सर्वसामान्य नागरीकांना जागा नसते. शहरातील ज्या नवीन पाईपलाईन टाकायचे ( पाणी वितरण व्यवस्था )काम झाले ?त्या 42 कोटीच्या पाणी योजनेची ट्रायल झाली पाहिजे व राहिलेले से कामे असेल ते पूर्ण केल्याशिवाय कोपरगाव शहराला रोज, दिवसाआड , दोन दिवसाआड पाणी देता येणार नाही. ( अर्थात शहराला मुबलक साठवण झाले तरी) आधी हे वितरण व्यवस्थेचे कामे करणे गरजेचे आहे. शहरात पाण्याच्या उंच टाक्याही झाल्यात, पाणी शुद्धीकरणाचा फिल्टरेशन पलांटही नवीन झाला आहे. पण जोपर्यंत संपूर्ण शहरातील टाकलेल्या पाईपलाईनची ( पाणी वितरण व्यवस्थेची) त्यात पूर्ण दाबाने पाणी सोडून ट्रायल होत नाही, तोपर्यंत लिकेज कोठे आहे , कोठे जोडणी बाकी आहे, कोठे पाईप टाकावे लागतील ते समजणार नाही. आणि जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत कितीही जनतेला त्रास झाला आणि ते वैतागून पाण्यात घाण, अस्वच्छ पाणी येते हया बाबत कितीही कळकळुन बोलले तरी पाणी स्वच्छ मिळु शकणार नाही हे जमतेने लक्षात घेतले पाहिजे. यासाठी महिला भगिनींनी, नागरिकांनी नगरपालिकेसमोर येऊन हे काम का पूर्ण करत नाही याचा जाब आपापल्या पद्धतीने विचारून तो तातडीने पूर्ण करायला लावला पाहिजे.

     खरे तर नगरपालिकेने ही ट्रायल पूर्ण पाणी दाबाने आत्ताच याच ( सप्टेंबर) महिन्यातच घेतली पाहिजे, कारण भरूपूर पाणी असल्याशिवाय पाईप लाईनची ट्रायल घेता येणार नाही. सद्यस्थितीला पावसाळा चालू असून (गोदावरी नदीला पाणी चालूच आहे ) कॅनॉल मधून ओव्हरफ्लो चे पाणी चालू आहे तोपर्यंत पाईपलाईन पाणी ट्रायल होऊन जाईल व जनतेच्या पाणी दिवसात वाढ होणार नाही.सद्यस्थितीला धरण क्षेत्रात पाऊस चालू असल्याने ओव्हरफ्लो चे पाणी कॅनॉल ला सोडलेले आहे.कॅनॉल चालू असेपर्यंत पाईपलाईनची ट्रायल होउन अर्धवट राहिलेले कामे नगरपालिकेला करायला सोपे होईल व जनतेला घाण व गढुळ पाण्यापासून होणारा त्रास बंद होईल.

   नवीन जे 28 रस्त्यांचे कामे सुरु होणार आहे ते करायच्या आधी त्या रस्त्याच्या खालुन किंवा बाजूने, साईड पट्टीखाली, पाईप लाईन जर असतील किंवा त्यांची ट्रायल पूर्ण दाबाने झाली नसेल तर आताच ही योग्य वेळ आहे, पूर्ण पाण्याचा दाबाने ( हैड्रोलिक ) ट्रायल लवकर करून घ्यावी, तसेही डांबरीकरण करणेसाठीचे हॉट मिक्स फ्लांट हे शक्यतो दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने चालु होतात, तसेच संपूर्ण गावातील पाईपलाईनची ट्रायल घेतली नसेल तर घेतली पाहिजे जेणेकरून नंतर नवीन झालेले रस्ते फोडण्याची किंवा उकरण्याची वेळ नगरपालिकेवर येणार नाही व खराब रस्त्यांचा जनतेला आत्ता सारखा त्रास सहन करावा लागणार नाही किंवा होणार नाही याचा विचार नगरपालिकेने करावा अशा प्रकारची भेट घेऊन चर्चा करून मुख्याधिकारी यांना विनंतीपूर्वक माजी नगराध्यक्ष मंगेश पाटिल यांनी सांगितले.

           पाण्यासाठी शासन दरबारी आंदोलन पद्धतीने प्रयत्न करणारे राजेश मंटाला व शेताच्या पाणी विषयी ग्रामीण भागातील अभ्यासक तुषार विध्वंस यांनी घेतलेल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेब यांच्या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News