साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक


साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी व अन्य पाच जणांना अटक

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी चे प्रशासकीय विभाग प्रमुख राजेंद्र जगताप व अन्य पाच जणांना काल रात्री पोलिसांनी अटक केली .

     श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी अजित जगताप, कर्मचारी सचिन गव्हाणे, राहुल फुंदे यांनी सी.सी.टी.व्ही विभाग प्रमुख विनोंद कोते, कर्मचारी चेतक साबळे यांना हाताशी धरुन तदर्थ समितीचे अध्यक्ष व सदस्या हे तदर्थ समितीपुढील विषयसुची तील विषय क्रमांक 27 व 67 च्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता तदर्थ समितीचे अध्यक्ष व सदस्या यांनी श्री साईबाबा समाधी मंदिर येथे प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करतांनाचे व्हिडीओ क्लिप किंवा फोटो काढुन तदर्थ समितीचे अध्यक्ष व सदस्या यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने संस्थानचे बाहेर पत्रकारांना पाठवले तसेच साईबाबा संस्थानची सुरक्षा धोक्यात येईल असे कटकारस्थान करुन बदनामी कारक मजकुराची बातमी प्रसारीत केली. तसेच त्यांनी संगणमत करुन सी.सी.टी.व्ही. फुटेज व फोटो हे स्टोअर केलेल्या संगणकातुन काढुन घेतल्याचे दिसुन आले आहे. सदर संगणकातील व सी.सी.टी.व्हीतील फोटो विनापरवाना घेऊन प्रसारीत केल्याचे दिसुन आले आहे. संगणकात स्टोअर असलेले फोटो यांची कॉपी करुन छेडछाड केली तसेच हे काम करत असतांना कार्यालय प्रमुख यांनी सह आरोपींना मदत केली व 31 जुलै 2021 रोजी ते 06 ऑगस्ट 2021 रोजी पर्यंतची हार्डडिस्क मधील फोटो डिलीट केल्याचे दिसुन आले. नमुद कर्मचारी हे निमशासकीय कर्मचारी व नोकरदार असुन त्यांनी व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय स्वत:च्या फायदयाकरीता व अध्यक्ष व सदस्या, तदर्थ समिती यांची बदनामी व्हावी या उद्देशाने प्रसारीत केले आहे. मा.अध्यक्ष व सदस्या, तदर्थ समिती यांच्या लौकीकास बाधा येईल असे वर्तन करुन व्हिडीओ व फोटोमध्ये छेडछाड व बनावटीकरण करुन प्रसारीत केले. बाबत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमदनगर तथा अध्यक्ष तदर्थ समिती, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी यांचे कडील क्रमांक जा.नं. आस्था/321/2021 दिनांक 23/08/2021 अन्वयेच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.         

वगैरे म।. च्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर   31O/2O21 भादंवि कलम 5 O1,4O8,465,469,34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66Br /w 2 (1)(K), 66r/w43 (a), 43(b), 43(g), 43 (i), 84(b) तसेच शासकीय गुपिते अधिनियम 1923चे कलम 5(d) प्रमाणे आरोपी राजेंद्र जगताप शिर्डीचे प्रशासकीय विभाग प्रमुख, अजित जगताप श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी, सचिन गव्हाणे कर्मचारी, राहुल फुंदे सी. सी.टी.व्ही.विभाग प्रमुख, विनोंद कोते, चेतक साबळे कर्मचारी व इतर सर्व रा. शिर्डी ता. राहाता यांचे विरुद्ध फिर्यादी हर्षवर्धन गोविंदराव गवळी, पोलिस निरिक्षक, साईमंदिर सुरक्षा, शिर्डी  ता. राहाता जि. अहमदनगर यांनी गुन्हा घ.ता. 31/7/2O21 रोजी व 2/8/2O21 रोजी चे23/59 दरम्यान श्री साईबाबा मंदिर शिर्डी ता. राहाता व गुन्हा दाखल ता. 21/9/2O21 रोजी 18/34वा.गुन्हा दाखल होण्यास विलंब कारण- फिर्वादीने आज रोजी तपास करून फिर्याद दिल्याने, स. फौ.मोरे दाखल अंमलदार शिर्डी, पो.नि.गुलाबराव पाटील तपासी अंमलदार शिर्डी पोलिस स्टेशन शिर्डी हे पुढील तपास करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News