पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार


पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने सी.ए. उत्तीर्ण झाल्याबद्दल चैतन्य शिरसुलचा सत्कार

चैतन्यचे यश भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक -  नारायण मंगलारम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) एका सामान्य कामकरी, कष्टकरी अशी समाजातून, अल्पशिक्षित तरी होतकरू कुटुंबातून येऊन चैतन्यने मारलेली कर्तृत्वाची उंच गगनभरारी आपल्या समाजाला भूषणावह आहे. नावाप्रमाणे नित्यनवीन, टवटवीत असणारे आपण, कर्तृत्वाने आपल्या समाजात नवंचैतन्य निर्माण केले आहे, आपले हे यश आमच्यासाठी आणि येणाऱ्या आपल्या भावी पिढ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.  

     पद्मशाली युवा शक्ती, पद्मनादम ढोल ताशा वाद्य पथक आणि पद्मशाली महिला शक्तीच्या वतीने भारतातील सर्वात कठीण परीक्षा पैकी एक समजल्या जाणाऱ्या सी.ए. अर्थात चार्टर्ड अकाउंटंट ची फायनल परीक्षा विशेष श्रेणीत उत्तीर्ण केल्याबद्दल येथील चैतन्य मधुकर शिरसुल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. मंगलारम बोलत होते. येथील "पद्मशाली युवाशक्ती ( ट्रस्ट ) अहमदनगर" "पद्मनादम ढोलताशा वाद्य पथक, अहमदनगर" आणि "पद्मशाली महिला शक्ती, अहमदनगर" यांच्या वतीने या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चैतन्यचा सहकुटुंब गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. माझ्या या यशात माझ्या मोठया बंधूंचा आणि आईवडिलांचा महत्वाचा वाटा असून, जिथे गरज पाडेल तेथें मी आपल्या समाजाच्या मदतीसाठी सदैव तत्पर असेन, कोणत्याही विद्यार्थ्याला मार्गदर्शनासाठी नेहमी उपलब्ध असेन, असे सत्काराला उत्तर देतांना चैतन्य शिरसुल म्हणाला. 

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली युवाशक्तीचे सुमित इप्पलपेल्ली होते, तर नगर जल्लोष परिवाराचे सागर बोगा, योगेश म्याकल, दीपक गुंडू, अजय म्याना, श्रीनिवास इप्पलपेल्ली, नारायण मंगलारम, विराज म्याना यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीनिवास एल्लारम यांनी सूत्रसंचालन केले तर सागर बोगा यांनी आभार मानले.

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News