अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड


अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड

शिरूर | प्रतिनिधी(अप्पासाहेब ढवळे ) अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका अध्यक्षपदी प्रदीप उर्फ आबासाहेब  सोनवणे तर महिला अध्यक्षपदी शशिकला काळे यांची निवड करण्यात आली.

           शिरूर येथे आयोजित बैठकीत तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रभारी पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड, प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष शोभना पाचंगे, प्रभारी युवक जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे,वर्षाताई काळे,अविनाश जाधव,शैलजा दुर्गे, जिजाताई दुर्गे, दादासाहेब भोंडवे, राहुल शिंदे, संपत दसगुडे, जालिंदर कुरुंदळे, वैशाली गायकवाड, राणी कर्डीले, ठुबे ताई, नंदू जाधव, बाबा जाधव, संतोष पाचर्णे, सुनिल डांगे यांसह आजी माजी पदाधिकारी व सभासद आदींच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

           नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शिरूर तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब  सोनवणे,शिरूर तालुका महिला अध्यक्षा शशिकला काळे,शिरूर तालुका प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनवणे,  शिरूर तालुका युवक अध्यक्ष गणेश सरोदे,शिरूर तालुका युवक अध्यक्षा प्रियंका वाळके, शिरूर शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शिरूर शहर अध्यक्ष अनिल डांगे,शिरूर शहर महिला अध्यक्षा उर्मिला फलके,शिरूर शहर युवक अध्यक्ष सचिन जाधव,शिरूर शहर युवक सरचिटणीस अनिरुद्ध राखुंडे, शिरूर शहर युवती अध्यक्ष पूजा पंदरकर यांची निवड करण्यात आली तसेच मराठा समाजातील तळागाळातील समाज बांधवांच्या विकासासाठी काम करणार असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News