भ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात... शासनाला येणार तरी केंव्हा जाग ...?


भ्रष्टाचाराच्या विरोधात उतरली महिला रनागनात...  शासनाला येणार तरी केंव्हा जाग  ...?

ढोक सांगवी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिरुर पंचायत समिती कार्यालयासमोर प्रियंका जगताप यांनी आमरण उपोषण केले सुरु

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

 शिरुर तालुक्यातील ढोक सांगवी येथील ग्रामपंचायती मध्ये मोठया प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका जगताप यांनी सुरु केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही कोणताही तोडगा न निघाल्याने हे आमरण उपोषण सुरुच होते.                                                  

           प्रियंका जगताप यांनी पंचायत समिती कार्यालया समोर सोमवारपासून दि.२० रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.येथील ग्रामपंचायत कामात सन २०१३ - १४ मध्ये आर्थिक गैरव्यवहार सिद्ध होऊन देखील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कुठलीही कारवाई न होणे, ग्रामसभा न घेता अनेक विकासकामे सरपंचाच्या सांगण्यावरुन चुकीची कामे करुन ठराव नसताना बिले अदा करणे, एकाच रस्त्याला वेगवेगळे टेंडर काढून निकृष्ट दर्जाचे काम करुन अनेक वेळा बिल काढणे, टेंडर न करता रस्त्याचे काम करणे यांसह अन्य गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रियंका जगताप यांनी सांगितले.असताना देखील या दरम्यान याबाबत गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता,या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येऊन अहवाल तयार करुन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नलावडे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News