आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन - नितीन धांडे


आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन - नितीन धांडे

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार  रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि रोहित दादा पवार युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण कर्जत तालुक्यात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली. असून परिसरातील युवक-युवतींनी या शिबिराचा  लाभ घ्यावा असे आवाहन युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे. ज्या पंचायत समिती गणात सर्वाधिक रक्तदाते रक्तदान करतील त्या गणास आ रोहित पवार चषक देण्यात येणार असल्याचे धांडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना धांडे म्हणाले की या घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास तीन हजार व्यक्तींनी रक्तदानासाठी नाव नोंदणी केली असल्याची माहिती धांडे यांनी दिली 

दिनांक २९ सप्टेंबर रोजी कर्जत- जामखेडचे आ रोहित पवार यांचा वाढदिवस असून त्याचे औचित्य साधत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस  आणि रोहित दादा पवार युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या बाबत सोमवार, दि २० रोजी कर्जत येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले . या वेळी कर्जत शहर युवकचे शहराध्यक्ष प्रा विशाल मेहेत्रे, सागर लोंढे, एकनाथ दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कर्जत शहर आणि तालुक्यातील युवक-युवतीने मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले. आ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील पंचायत समिती गणानुसार भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास एक ट्रक सुट, मास्क आणि सॅनिटायजर चे वाटप करण्यात येणार आहे. यासह युवती आणि महिलांसाठी ट्रक सुट अथवा स्वयंपाकां साठी लागणारे कुकर भेट दिले जाणार असल्याची माहिती नितीन धांडे यांनी दिली . तसेच ज्या पंचायत समिती गणात सर्वाधिक रक्तदान पार पडेल त्या गणास आ रोहित पवार चषक देण्यात येईल अशी माहिती तालुकाध्यक्ष नितीन धांडे यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पांडुळे यांनी केले तर आभार सचिन दरेकर यांनी मानले. 

- पंचायत समिती गणनिहाय रक्तदान पुढीलप्रमाणे :

दि २१ सप्टेंबर - जगदंबा विद्यालय राशीन, २२ सप्टेंबर - जि प प्राथमिक शाळा माहीजळगाव, २३ सप्टेंबर - बारडगाव सुद्रीक, २४ सप्टेंबर - साई हॉस्पिटल भांबोरा, २५ सप्टेंबर - जि प प्राथमिक शाळा कोंभळी, २६ सप्टेंबर - जि प प्राथमिक शाळा मिरजगाव आणि  शिंदा, २७ सप्टेंबर - जि प प्राथमिक शाळा कोरेगाव आणि २९ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जत याठिकाणी भव्य रक्तदान आयोजित केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News