बोरमलनाथ मंडळाने केला स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान.


बोरमलनाथ मंडळाने केला स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान.

वरवंड(विजय मोरे):-चौफुला येथील बोरमलनाथ मंडळाने यंदा गणेशोत्सवात;स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्याची संकल्पना राबविली आहे.स्वातंत्र्य सैनिक व माजी आमदार जगन्नाथ पाटसकर यांचे पुत्र हरिभाऊ पाटसकर यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.मंडळाचे हे यंदाचे ३६वे वर्ष आहे.यामुळे कोरोना मुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा होत आहे.

   व्यर्थ न हो बलिदान अर्थात अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा व सन्मान स्वातंत्र्य सैनिकांचा' ही संकल्पना आयोजिली आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेक राष्ट्र पुरूषांनी प्राणांची आहुती दिली आहे.स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दौंडमधील १६ जणांचा सहभाग होता.मात्र या१६ स्वातंत्र्य सैनिक कोण होते याचा उलगडा अद्याप अनेकांना झालेला नाही.असे मंडळाचे अध्यक्ष सतीश लव्हे व एकनाथ भोसले यांनी यावेळी सांगितले.  

   यावेळी जगन्नाथ पाटसकर, रामचंद्र आहेर, लक्ष्मण कुलकर्णी, सदाशिव फडके, नामदेव फडके, बापू दिवटे, विष्णुपंत कुलकर्णी, गणपतराव हंबीर, गुलाबराव ठाकर, सुदाम म्हस्के,नारायण फडतरे, दत्तात्रेय वळसंगकर, राजाराम भंडलकर, श्री. भिडे, व्यकंटेश अवचट, किसनदास कटारिया या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना आरतीचा मान व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे.                                                         यावेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते हरिभाऊ पाटसकर यांचा सन्मान करण्यात आला.कोरोनाच्या परस्थितीमुळे बोरमलनाथ मंडळाने यंदा ग्रामस्थांकडून वर्गणी न घेता साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.हा स्तुत्य उपक्रम इतर मंडळासाठी प्रेरणादायी ठरत आहे.मंडळाचे यंदा अमृतमहोत्सवानिमित्त गणेश मंदिरात लालकिल्ला,भारतमाता व राष्ट्रपुरूषांच्या तैलचित्र लावण्यात आली आहेत.    

   व्यर्थ न हो बलिदान अर्थात अमृतमहोत्सव स्वातंत्र्याचा व सन्मान स्वातंत्र्य सैनिकांचा' ही संकल्पना आयोजिली आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना अनेक राष्ट्र पुरूषांनी प्राणांची आहुती दिली.स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दौंडमधील १६ जणांचा सहभाग होता.१६ स्वातंत्र्य सैनिक कोण हे अद्याप अनेकांना माहित नाही.असे मंडळाचे अध्यक्ष सतीश लव्हे व एकनाथ भोसले यांनी सांगितले.  

अमृतमहोत्सवानिमित्त मंडळाने मंदिरात लालकिल्ला,भारतमाता व राष्ट्रपुरूषांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News