वरवंड येथे चालक दिन साजरा!


वरवंड येथे चालक दिन साजरा!

वरवंड:-(विजय मोरे)दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहन चालकांचे महत्वाचे योगदान आहे.व त्यांचे महत्व लक्षात घेऊन दिनांक १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून साजरा करण्यात यावा; यासाठी परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन विभागाला याबाबत आदेश दिले होते.त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १७ रोजी दौड तालुक्यातील वरवंड येथे एस.टी बस व पीएमपीएल च्या बस चालकांचा अ.भा.ग्राहक पंचायत व प्रहार संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

    यावेळी वरवंड येथे बार्शी-मुंबई ह्या बसचे चालक चांदोलकर व वरवंड-हडपसर या बसचे चालक मलभारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अ.भा.ग्रा.पंचायतीचे दौड तालुका संघटक राजेंद्र शेलार, दौंड तालुका प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष दिवेकर,नाथा थोरात,अनिल फरगडे, शरद दिवेकर,जालिंदर दिवेकर,विनोद सरनोत,अरुण दिवेकर बाळासो दिवेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News