कोल्हार महाविद्यालयात राष्ट्रभाषा दिन साजरा


कोल्हार महाविद्यालयात राष्ट्रभाषा दिन साजरा

कोल्हार : - (प्रतिनिधी )कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रभाषा हिंदी दिवसा निमित्त महाविद्यालयातील हिंदी विभागाने ऑनलाइन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निबंध स्पर्धा, वकृत्व, शुद्ध हस्ताक्षर,अशा प्रकारच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शेवटी कार्यक्रमाचे आयोजन करून हिंदी सप्ताह साजरा केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून प्रमुख पाहुण्यांचे व अतिथींचे व्याख्यान आयोजित केले गेले. विद्यार्थी या व्याख्यानातून बोलण्याची कला अवगत करत असतात, सुविचार म्हणी व वाक्प्रचार आपल्या भाषणात कसे वापरायचे याचं ज्ञान घेत असतात. महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हिंदी दिवसाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या व्याख्यानासाठी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री विखे पाटील महाविद्यालया तील विभागाध्यक्षा डॉ. सौ. सुजाता लामखडे  त्यांनी आपल्या भाषणात हिंदी दिवसाचे महत्त्व स्पष्ट करताना "हिंदी साहित्याची ओळख रस भाव, छंद भाषेमध्ये कसे वापरायचे, बोलताना शब्दाचे उच्चार स्पष्ट असले पाहिजे शेवटी कोमलता व शुद्धता ही भाषेची वैशिष्ट्ये आहेत" असे समजावून सांगितले. हिंदी साहित्य मध्ये सुद्धा मानव जीवनाचे रहस्य लपलेले आहेत असे स्पष्ट केले. आजच्या या वर्तमान युगात राष्ट्रभाषा हिंदी स्वबळावर विश्व भाषा म्हणून वाटचाल करीत आहे. भाषा हीच माणसाची खरीओळख आहे.

या कार्यक्रमाचे दुसरे विशेष  वक्ते डॉक्टर अनंत केदारे यांनी राजभाषा हिंदी चा इतिहास समजावून सांगितला हिंदी भाषा ही एका मताने कशी मान्य झाली हे ही स्पष्ट केले एवढे असून सुद्धा हिंदी भाषा प्रत्येक क्षेत्रात स्वबळावर आपलं स्थान निर्माण करत आहे. जाहिराती पासून ते जय हो पर्यंत व  सूत्रसंचालन पासून ते बातम्या पर्यंत आणि मीडिया पासून ते मेडिकल  पर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये हिंदीची परिस्थिती आज मजबूत होत आहे असे ठणकावून सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्रीमती जयश्री सिनगर हे होते.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण तुपे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उत्तमराव येवले यांनी केले. याप्रसंगी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व सेवक वृंद उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News