सकल मराठा महिला मंडळ,शेवगाव तालुका यांच्या वतीने आज भगुर येथिल गरजू आणि गरीब पूरग्रस्त महिलांना खारीचा वाटा म्हणुन जीवनावश्यक वस्तुंची मदत


सकल मराठा महिला मंडळ,शेवगाव तालुका  यांच्या वतीने आज भगुर येथिल गरजू आणि गरीब पूरग्रस्त महिलांना खारीचा वाटा म्हणुन जीवनावश्यक वस्तुंची मदत

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगांव तालुक्यात नदी किनारी झालेली आतोनात हानी आणि शासनाकडून मदत मिळायला होणारा उशीर याची जाण ठेऊन शेवगांव तालुका सकल मराठा समाजाच्या भगिनींनी साधारण दोन महिने पुरेल इतका किराणा आणि धान्य ,वर्षभर पुरेल इतके कपडे,साड्या आणि मोठ्या प्रमाणात भांडीअन्न धान्य, किराणा, कपडे, संसार उपयोगी  भांडी, किराणा, इत्यादी वस्तू चे वाटप करण्यात आले* या वेळी सौ.अश्विनी गवळी, सौ. सीमा मोरे, सौ. सुनीता गवळी सौ.वर्षा भोसले, सौ.सारिका पूरनाळे, सौ,डॉ.पल्लवी घनवट, सौ. छाया आढाव, सौ.वैशाली काकडे, सौ.ज्योती बर्डे, सौ. डॉ.स्वाती लांडे, सौ.अश्विनी ढगे,  कु.पूजा गवळी, सौ .मालिनी उकिरडे  सौ.जयश्री फलके  सौ.मनीषा थोरात सौ.मनीषा घुमरे, आणि सौ.सोनाली बर्डेयांनी या साठी मोठ्या प्रमाणात सहयोग दिला.भिष्यातही अशी जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प उपस्थित महिला मंडळाने केला अजुन खुप मोठया प्रमाणात मदतीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने तालुक्यातुन आणि जिल्ह्यातुनअसे मदतीचे हात समोर येणे गरजेचे आहे 

आपल्या रोजच्या संसार गाड्यातून वाचविले पैसे आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचे काहीतरी देणे लागतो या उक्ती प्रमाणे अडचणीत सापडलेल्या माता भगिनींना ज्यांचा संसारच उघड्यावर आला आहे अश्या महिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News