घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार यवत पोलिसांकडून चोरी करताना अटक,पिंपळगाव येथे बाजरीचे पोते चोरताना सापडला चोर


घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार यवत पोलिसांकडून चोरी करताना अटक,पिंपळगाव येथे बाजरीचे पोते चोरताना सापडला चोर

विठ्ठल होले विशेष  प्रतिनिधी : 

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव गावचे हद्दीत यातील आरोपी याने बंद झोपडीचा पडदा बाजूला करून झोपडी तील एक बाजरीचे पोते डोक्यावर घेऊन निघाला असताना त्यास यवत पोलीस स्टेशन स्टाफ व तेथील लोकांनी ताब्यात घेऊन  यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८२९/२०२१ भा. द.वि.३८० प्रमाणे गुन्हा दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणलेला आहे,आरोपी लाल्या उर्फ शरद दुर्योधन काळे वय २१ वर्षे रा.आलेगाव पागा ता.शिरूर जि.पुणे यास सदर गुन्ह्यात अटक केली असून त्याचे कडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले आहे,सदर आरोपीकडून  घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला असून त्याचे कडून १,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

  सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो.,बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते सो., उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सो. यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार,पो. हवा संदीप कदम,पोहवा. निलेश कदम,पो.हवा. गुरू गायकवाड,पो.शि. सोमनाथ सुपेकर,पो. शि. मारुती बाराते यांनी केलेली आहे.पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News