पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बारा दिवसीय मोफत फूट थेरेपी कॅम्पचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बारा दिवसीय मोफत फूट थेरेपी कॅम्पचे आयोजन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी,स्मितसेवा फाउंडेशन व स्मृती सेवा सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,

या कॅम्प मध्ये प्रत्येकाला रोज अर्धा तास थेरपी - रेग्युलर 12 दिवस दिली जाणार आहे. या थेरपी मध्ये रक्ताचा प्रवाह वाढून बर्‍याचशा आजारांना आळा बसतो जसे हातापायांना मुंग्या, पाठ दुखी, कंबर दुखी, निद्रानाश, ऍसिडिटी , व्हेरिकोज व्हेन्स, मधुमेह, सांधेदुखी व वेदना , वाढते वजन , मणक्याचा त्रास ,  टाच दुखी व सायटिका, पॅरलिसीस, स्नायू व रक्तसंबंधी होणाऱ्या आजारांना आळा घातला जातो. यामध्ये प्रतिकारशक्ती वाढते. तीस मिनिटाचे थेरपीमध्ये पाच किलोमीटर सायकल चालवण्याचे फायदे मिळतात.ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश पिंगळे, नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, हडपसर विधानसभा संघटन सरचिटणीस गणेश घुले, पुणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विशाल केदारी, पुणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष बंडू कचरे,  जनसेवा बँकेचे संचालक रवीभाऊ तुपे, तारांगना प्रॉपर्टीजचे मालक तुषार गायकवाड, ओबीसी मोर्चा अध्यक्ष हडपसर विधानसभा संजय सातव, सामाजिक कार्यकर्ते अजय न्हावले,  हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष स्वाती कुरणे, हडपसर विधानसभा ओबीसी महिला आघाडी अध्यक्षा सीमा शेंडे, व्यापारी आघाडी अध्यक्षा सविता हिंगणे, मनीषा राऊत, सोनल कोद्रे, मंगल रायकर, निखिल शिंदे, बालगुडे सर, डॉ अशोक सोरगाविकर, रवींद्र चव्हाण, महेश ससाणे, हनुमंत घुले, दीपक भोसले, राजेश कांबळे, नितीन ससाणे, विजय नायर, अमोल दुगाणे, श्रीकृष्ण भिंगारे, सतीश भिसे, ओंकार तुपे, पंकज दर्शीले, काशिनाथ भुजबळ, दिलीप भुजबळ, संतोष भुमकर, आप्पा हिंगणे, संतोष भाटिया, किशोर भोर, दीपक चौधरी उपस्थित होते. 

तसेच स्मितसेवा फाउंडेशनच्या माध्यमाने संगीता पाटील, 6 विजया भुमकर, आशा भूमकर, मोहिनी शिंदे, सुजाता गायकवाड, संगीता बोराटे, नूतन पासलकर, अपर्णा बाजारमठ, निकिता निंगले, नीता भुमकर, शुभांगी भोगले, नेहा वाले, रूपाली वर्मा, सुरेखा बनकर , अमृता यादव इ. स्मितसेवा फाउंडेशन सदस्य उपस्थित होते. 

यावेळी स्वप्नपूर्ती सोसायटीचे सेक्रेटरी योगेश आवटी यांनी विशेष  सहकार्य केले. मोफत थेरपीची सेवा देणारे स्टार हेल्थ वेलनेस सेंटरच्या माधुरी कामठे यांच्या सहकार्यातून हा उत्तम असा समाजपयोगी कॅम्प चालू झाला.सर्वांनी या थेरेपीचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे,या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा  पुणे शहर उपाध्यक्षा, स्मितसेवा फौंडेशनच्या अध्यक्षा स्मिताताई गायकवाड यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News