कर्जतचे भाजपाचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा भाजपाला अखेर रामराम लवकरच पुन्हा राष्ट्रवादीत होणार दाखल


कर्जतचे भाजपाचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा भाजपाला अखेर रामराम लवकरच पुन्हा राष्ट्रवादीत होणार दाखल

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे नेते नामदेव राऊत यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्य व सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा नुकताच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पाठवला असून नामदेव राऊत आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याचे संकेत राऊत यांनी दिले आहेत. नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मी भाजपच्या सदस्य पदाचा व सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्या ची  घोषणा केली असून ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील असे संकेत दिले. यावेळी बोलताना नामदेव राऊत म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेप्रमाणे अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून काम केलेले आहे. तसेच भारतीय जनता पार्टीने मला अनेक वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी दिली होती. आणि मी ही ती माझ्या पद्धतीनं कौशल्य वापरून पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कर्ज शहरापासून ते राज्यातील अनेक जिवाभावाचे मित्र मिळाले आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मला मदत मिळाली असे नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच जिल्ह्याचे माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांच्याबरोबर मी गेली दहा-बारा वर्षे काम केलं असून अनेक विकास कामे त्यांच्या माध्यमातून केली आहेत. तसेच शिंदे यांच्याकडून मला खूप काही शिकण्यास मदत मिळाली. याचबरोबर दक्षिणेचे खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे मला चांगले मार्गदर्शन लाभले आहे असे नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय दिलीप गांधी अभय आगरकर यांचेही मला चांगले मार्गदर्शन लाभले व सहकार्य मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मला नेहमीच सहकार्य केले होतं या सहकार्याबद्दल नामदेव राऊत यांनी भाजपमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे व नेत्यांचे आभार मानून भारतीय जनता पार्टीच्या सदस्य व क्रियाशील सदस्य पदाचा  राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

नामदेव राऊत यांचा राजकीय जन्म तसा शिवसेनेत झालेला होता नामदेव राऊत यांनी शिवसेनेचे अनेक वर्षे काम केले आणि शिवसेना ही त्या काळी वाढली होती परंतु कालांतराने नामदेव राऊत यांनी शिवसेना पक्ष सोडून कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री  स्वर्गीय आर आर पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता परंतु कालांतराने राऊत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप मध्ये त्यांनी अनेक राजकीय पदे भोगली कर्जत नगरपंचायतचे ते  प्रथम नगराध्यक्ष  झाले आणि आता राज्यातील भाजपची सत्ता गेल्यामुळे राऊत पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर असून आता राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांच्या उपस्थितीत ते उद्या प्रवेश करतील याबाबत थोडीशी वाट पहावी लागणार आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News