दोन महीण्याचे थकीत मानधन लवकर न मिळाल्यास आशा व गट प्रवर्तक रस्त्यावर ऊतरण्याच्या तयारीत


दोन महीण्याचे थकीत मानधन लवकर न मिळाल्यास आशा व गट प्रवर्तक रस्त्यावर ऊतरण्याच्या तयारीत

राहाता - गेले दोन महीण्या पासून राज्याने व केंद्राने वाढवून दिलेले मानधन तर मिळालेच नाही परंतु जे रेग्युलर मानधन आहे ते देखील दोन महीन्या पासून मिळाले नाही तीस सप्टेंबर पर्यंत थकीत मानधन मिळाले नाही तर एक आक्टोबरला आशा व गट प्रवर्तक राहता येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक, चितळी रोड येथे रास्ता रोको आंदोलन करतील अशी माहीती आशा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. ॲड.सुधिर टोकेकर व जिल्हा संघटक कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी काल राहता तालुका कार्यकारीनी निवडीच्या वेळेस दिली. राहाता तालुका कार्यकारीनी काल साई विठ्ठला लाँस राहता येथे असंख्य आशा व गट प्रवर्तक यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. त्या मध्ये राहता तालुका आशा गट प्रवर्तक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गट प्रवर्तक सौ. अंजली तरकसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सौ. सविता धापटकर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

सुनिता धामने उपाध्यक्ष,अनिता जाधव उपाध्यक्ष,अश्विनी खाकाळे उपाध्यक्ष, सौ. वैशाली नेमाडे तालुका सेक्रेटरी, प्रतीभा वैद्य सहसेक्रेटरी, शबाना तांबोळी सहसेक्रेटरी, मुक्ता तांबे खजीनदार,कॉ. प्रा. एल एम डांगे मार्गदर्शक,वैशाली देव्हारे तालुका संघटक,कार्यकारीनी सदस्य. हर्षाली जाधव, वर्षा मांडके , सोणाली शेजुळ, रेबिका गोडगे , शोभा साठे, अश्विनी भालेराव , ज्योती जेजूरकर, संगीता भालेराव , सुनिता नरवडे सुनिता निकाळे.

वरील प्रमाने कार्यकारीनी बनविण्यात आली असून सदर कार्यकारीनी झाल्या नंतर आशा गटप्रवर्तक महिलांनी आपल्या तिव्र भावना या वेळेस बोलून दाखविल्या आम्ही आमच्या जीवाची व कुटूंबाची पर्वा नकरता कोव्हीडचे काम करत आहोत प्रत्येकाच्या घरी जाऊन कोव्हीडचे काम करत असताना आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो याची शासन देखील दखल घेत नाही आमचा सन्मान करतात मानपत्र देतात परंतू त्याने पोट भरत नाही आमचे थकीत मानधन ताबडतोप जमा करावे नाहीतर आम्ही राहाता येथे छत्रपती शिवाजी चौकात एक आक्टोबरला रास्ता रोको आंदोलन करू.

यावर बोलताना संघटनेचे जिल्हा संघटक कॉम्रेड सुरेश पानसरे म्हणाले कि महाराष्ट्रात आशांनी कोव्हीड मध्ये जे काम केले त्याला तोड नाही परंतु शासन त्यांच्या मानधना बाबतीत उदासीन आहे असे दिसते. तिस सप्टेबर पर्यंत त्यांचे मानधन बँकेत जमा झाले नाही तर एक आक्टोबरला राहता तालुक्यातील आशा नगर मनमाड महामार्ग राहता चितळी चौकात रोखून धरतील याची शासनाने दखल घ्यावी.

या वेळेस संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. सुधिर टोकेकर यांनी आशांचे प्रश्न शासन दरबारी पोहचऊन शासनाचे आशा न बाबतीत जे धोरण आहे ते सविस्तर पणे मांडले.

यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. प्रा. एल . एम. डांगे यांनी आशांचे थकीत मानधन तीस सप्टेंबर पर्यंत जर जमा झाले नाही तर किसान सभा राहता तालुका सर्व एक आक्टोबर च्या रास्ता रोको आंदोलनात आशांना पाठींबा म्हणून रस्त्यावर उतरेल असे सांगीतले शेवटी सर्व नविन कार्यकारीनीचे सत्कार करण्यात आले.

साई विठ्ठला लॉन्सचे संचालक मा. वाबळे साहेब यांनी सर्व संघटना पदाधीकारी व नविन कार्यकारीनी यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News