जागतिक वाहन चालक दिनानिमित्ताने शिरुर येथील जोशीवाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकांचा सन्मानपूर्वक सत्कार


जागतिक वाहन चालक दिनानिमित्ताने शिरुर येथील जोशीवाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकांचा सन्मानपूर्वक सत्कार

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे ) " जागतिक वाहन चालक दिन"  याचे अवचित्य साधून  जागतिक वाहन चालक दिनानिमित्ताने शिरुर येथील जोशीवाडी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहन चालकांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व अल्पोपहार देऊन चालकांना सन्मानित करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

               याप्रसंगी शिरुर येथील तहसिलदार लैला शेख,शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत,डाॅ.अजित शिंदे( प्रादेक्षिक परिवहन अधिकारी पुणे),संजय ससाणे(उप प्रादेक्षिक परिवहन अधिकारी पुणे)व श्री संजीव भोर यांचे मार्गदर्शनाखाली (RTO) प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक कृष्णात बामणीकर,मोटर वाहन पोलीस इन्स्पेक्टरअमर देसाई,पत्रकार अप्पासाहेब ढवळे, पत्रकार भाऊसाहेब खपके,माऊली मोटर ड्रायव्हिंग स्कुलचे गणेश रोटे उपस्थित होते.विशेष म्हणजे शिरुर येथील रामलिंग मोटार ड्रायव्हिंगच्या संचालिका पुष्पक केवडकर यांनी हा कार्यक्रम आयोजित करुन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले तर शिरूर पोलीस स्टेशनचे वाहन चालक पोलीस संतोष रामदास साठे यांचा देखील सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी शिरूर शहर व जोशीवाडी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News