झोपडी कॅन्टीन , अहमदनगर येथील प्रकाश वाईन्स या दुकाण मॅनेजरचे डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


झोपडी कॅन्टीन , अहमदनगर येथील प्रकाश वाईन्स या दुकाण मॅनेजरचे डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद , अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत )

झोपडी कॅन्टीन , अहमदनगर येथील प्रकाश वाईन्स या दुकाण मॅनेजरचे डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई प्रस्तूत बातमीची हकिगत अशी कि , दिनांक १२ / ० ९ / २०२५ रोजी प्रकाश वाईन्स . योपडी कॅन्टीन , अहमदनगर या दुकाणाचे मॅनेजर फिर्यादी श्री . आशीर बशीर शेख , वय -२ ९ वर्षे , रा . पंचवटीनगर , भिस्तबाग , सावेडी , अहमदनगर हे रात्री १०/०० वा . चे सुमारास दुकाण बंद करुन दिवसभर वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बॅगमध्ये ठेवून बॅग मोटार सायकलचे टाकीवर ठेवून घरी निघाले असता सारस्वत बँकेजवळ पाठीमागून काळ्या रंगाचे , विना नंबरचे पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे डोळ्यावर मिरची पावडर फेकली . त्यावेळी फिर्यादी यांनी रस्त्याचे कडेला त्यांची मोटार सायकल उभी केली असता सदर इसमाने फिर्यादी यांचे मोटार सायकल जवळ येवून पुन्हा फिर्यादी यांचे डोळ्यात मिरची पावडर टाकून फिर्यादी यांचे मोटार सायकलचे पेट्रोल टाकीवर ठेवलेली १०,७०,००० / -रु . रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेली होती . सदर घटनेबाबत तोफखाना पो.स्टे . येथे गुरनं . १८०६/२०२१ , भादवि कलम ३ ९ ४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील  अपर पोलीस अधीक्षक  सौरभ अग्रवाल, मा . उपविभागीय पोलीस अधिकारी विषाल ढुमे ,तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके अहमदनगर यांनी तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडले ठिकाणचे निरीक्षण करुन फिर्यादी यांचेकडून गुन्ह्यातील आरोपी बाबत माहिती घेतली . त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील  अहमदनगर यांचे आदेशाने  पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सुचना देवून आरोपींचा शोधार्थ रवाना केले . त्याप्रमाणे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे , पोहेकॉ  संदीप घोडके , संदीप पवार , दत्तात्रय गव्हाणे , मनोहर गोसावी , पोना  रवि सोनटक्के , शंकर चौधरी , ज्ञानेश्वर शिंदे , लक्ष्मण खोकले , संदीप चव्हाण , भरत बुधवंत , पोकॉ. योगेश सातपूते , सागर ससाणे , कमलेश पाथरुट हे गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा प्रकाश वाईन्स या दुकाणामध्ये काम करणारा कामगार लखन वैरागर , रा . नागापूर , अहमदनगर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे २ ) लखन नामदेव वैरागर , वय -२ ९ वर्षे , रा . सेंट मेरी चर्च गगे , नागापूर , अहमदनगर यास प्रथम ताब्यात घेतले . त्याचेकडे नमुद गुन्हयाबाबत व गुन्ह्यातील सार्थीदाराबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवून लागला . त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे इतर पाच साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे २ ) प्रमोद बाळू वाघमारे , वय- २३ वर्षे , रा . आण्णाभाऊ साठे समाज मंदीर शेजारी , नागापूर , अहमदनगर , ३ ) विशाल भाऊसाहेब वैरागर , वय -२५ वर्षे , रा . रस्तापूर , ता . नेवासा , ४ ) दिपक राजू वाघमारे , वय -२० वर्षे , रा . सेंट मेरी चर्च पाठीमागे , नागापूर , अहमदनगर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले . तसेच उर्वरित दोन साथीदारांचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाहीत . ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे वाटणीस आलेली ५,२०,००० / -रु . रोख रक्कम तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या ३,४०,००० / -रु . किं . च्या तीन मोटार सायकल व ४२,५०० / -रु . किं.चे चार मोबाईल काढून दिल्याने एकूण ९ , ०२,५०० / -रु . किं . चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पो.स्टे . येथे हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे . करीत आहेत . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , व श्री . विशाल ढुमे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हें शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News