पर्यावरण संवर्धनासाठी घराघरात नेमणार निसर्ग बालदूत पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार


पर्यावरण संवर्धनासाठी घराघरात नेमणार निसर्ग बालदूत पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार

पर्यावरण संवर्धनासाठी नवीन पिढी क्रांती घडवेल -अशोक सब्बन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण नवी पिढी चांगल्या प्रकारे करु शकत असल्यामुळे घराघरात निसर्ग बालदूत नेमण्याचा निर्णय पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती अशोक सब्बन व अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

नवीन पिढीला पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले असून, पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे सहकार्य मिळत आहे. यासाठी संघटनेच्या वतीने प्रत्येक घरातील मुलगा अथवा मुलींना ज्युनियर निसर्ग बालदूत म्हणून नेमणुक केली जाणार आहे. ते प्रत्येक घराच्या अंगणात राष्ट्रीय बालपक्षी चिमणी बगीचा या निसर्ग बालदूताच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्यासाठी घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांची मदत नक्कीच होणार आहे. घराच्या बागेत नारळ, आंबा, चिकू, मोगरा, जाई-जुई, फुल झाडांची आणि वेलींची लागवड करून वाढ केली जाणार आहे. यामुळे या भागात फुलपाखरे, मधमाशा, चिमण्या व पक्षी आल्याशिवाय राहणार नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News