ऑल इंडीया मोबाईल असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न


ऑल इंडीया मोबाईल असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबीर संपन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव,ता.१३: आँल इंडीया मोबाईल असोसिएशनच्या ७ व्या वर्धापन दिनानिमीत्त शेवगाव व पाथर्डी मोबाईल असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपन, मतिमंद मुलांना ड्रेस वाटप, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन वर्धापन दिन उत्सहात साजरा केला. 

   ऑल इंडिया मोबाईल असोसिएशनच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्य शेवगाव पाथर्डी मोबाईल असोसिएशनच्या वतीने शेवगाव येथे मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या शिबीरामध्ये ७८ जणांनी रक्तदान केले. शेवगाव व पाथर्डी येथे विविध ५० वनऔषधी झाडांचे वृक्षारोपन केले. तसेच पाथर्डी येथील मतिमंद मुलांच्या वस्तीगृहातील ६३ विदयार्थ्यांना टी शर्ट व पँन्टचे वाटप केले. यावेळी विदयार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत झाला होता. रक्तदान शिबीरासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे सहकार्य लाभले.  

   हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहमदनगर मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन डाके, शेवगाव मोबाईल असोसिएशन अध्यक्ष गौरव पितळे, पाथर्डी मोबाईल असोसिएशन अध्यक्ष गौतम भंडारी, निखील खेडकर, विशाल पिसाळ, सागर काळे, शामल लोहीया, सुमीत पितळे, भाऊ गिरगुणे, रामेश्वर मडके, सचिन शेळके, गणेश कबाडी, वसीम पठाण आदींचे सहकार्य लाभले. नगर येथील आनंदऋषी हाँस्पीटल रक्तपेढीचे डाँ. आशिष भंडारी, डाँ. सुनिल महानोर यांनी रक्तसंकलन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News