पाटस येथे अज्ञातांनी सरकारी विद्युत कंपनीचे टॉवर पाडले; खाजगी कंपनी व शेतकऱ्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर


पाटस येथे अज्ञातांनी सरकारी विद्युत कंपनीचे टॉवर  पाडले; खाजगी कंपनी व शेतकऱ्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

पाटस : येथे अज्ञात इसमांनी सरकारी विद्युत कंपनी अर्थात महापारेषणचे 3 टॉवर पाडल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी लोखंडी टॉवरचे गज कोणत्यातरी हत्याराने कापून टॉवर जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यात सरकारी मालमत्तेचे सुमारे साडेतीन कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद विठ्ठल मारुती कांबळे (वय 45, रा. गोपाळवाडी, ता. दौंड) यांनी दिली आहे. याबाबत अज्ञात इसमांविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     गेल्या काही दिवसापासून सरकारी विद्युत कंपनीचे टॉवर ज्या ठिकाणी उभारले जात आहेत तेथील शेतकरी व शेजारीच असणार्‍या एका कंपनीमध्ये वाद सुरू आहेत. हे टॉवर ज्या शेतामध्ये उभारले जात आहेत तेथील शेतकऱ्यांचा या टॉवर उभारणीस संपूर्णपणे विरोध आहे. परंतु तरीदेखील ज्या कंपनी करिता हे विद्युत टॉवर उभारले जात आहेत त्या कंपनीने मनमानी करून त्या टॉवर उभारणीचे काम सुरूच ठेवले होते. या वादाची परिणिती म्हणूनच सदरचे टॉवर पाडण्याची घटना घडली आहे. याबाबत कंपनीने शेतकऱ्यांकडे बोट दाखवले आहे तर शेतकऱ्यांनी हे काम कंपनीनेच घडवून आणले आहे असे आरोप केले आहेत. शेतकऱ्यांचा विरोध आहे हे लक्षात आल्याने कंपनीनेच पोलीस संरक्षणात हे काम सुरळीत पार पडावे यासाठी हे सर्व मुद्दाम केले आहे असेही काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकरी व खाजगी कंपनी यांच्यातील वाद उफाळून येतानाची चिन्हे दिसत आहेत. याबाबत अधिक तपास यवत पोलीस स्टेशन करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News