बारामती तालुक्यात सर्वत्र गणेशाबरोबर गौराईंचेही जोरदार स्वागत


बारामती तालुक्यात सर्वत्र गणेशाबरोबर गौराईंचेही जोरदार स्वागत

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती शहर व तालुक्यातील अनेक गावातून गणपती व गौराई यांचा सण उत्साहात साजरा होत आहे. बारामती येथील अनिता सावंत, अनुजा सावंत आणि श्रद्धा सावंत यांनी गौरीची आकर्षक सजावट करून दुसऱ्या दिवशी हळदीकुंकू व पुरणपोळीचे जेवण असा बेत करून त्याबरोबरच झोक्यावर बसलेली गौराई हा देखावा सादर केला असून तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

    दरवर्षीच गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक गणेश उत्सवाला मर्यादा आल्या आहेत. मात्र घरोघरी गणेशाची स्थापना करून महिलांनी गौरीचा सण नियमांचे पालन करून साजरा केला आहे. सावंत कुटुंबियांनी यावर्षीही आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेशाच्या स्थापनेसह गौराइंची आकर्षक सजावट केली आहे. गेल्यावर्षी पासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजनची फार कमतरता जाणवली त्यामुळे यंदाची गौरी सजावट वृक्षारोपणाचे महत्व देणारी केली आहे. गौरी सजावटीमध्ये पर्यावरण जागृतीचे अनेक संदेश दिले आहेत. त्यामुळे हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News