देशप्रेमी मित्र मंडळ,राजबाग तरूण मंडळ व विविध गणेश मंडळांतर्फेगौरी सजावट स्पर्धेचे आयोजन


देशप्रेमी मित्र मंडळ,राजबाग तरूण मंडळ व विविध गणेश मंडळांतर्फेगौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

पुणे-एरंडवणे भागातील देशप्रेमी मित्र मंडळ,राजबाग तरूण मंडळ,श्री शनी मारूती बाल गणेश मंडळ,अखिल गणेश नगर मंडळ, बाल तरूण मंडळ, लोकमान्य मित्र मंडळ, विर चिरंजीव संजयगांधी तरूण मंडळ व गणेश नगर मंडळ या प्रमुख मंडळांचे पदाधिकारी मंदार बलकवडे, सौ.सुरेखा होले,मंगेश मते,सचिन पवार,समीर येणपुरे,महेश सुपेकर,गणेश दळवी,रूपेश आटक,दिपक विश्वकर्मा,मनोज बलकवडे यांनी एकत्र येवून गणेश नगर ओटा वसाहत,संजय गांधी नगर, पौडफाटा, नेहरू वसाहत, १० चाळ, ७ चाळ, ३ चाळ गणेश नगर या भागातील रहिवाशांसाठी पर्यावरण पुरक गौरि सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. ३०० कुटूंबांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. विविध प्रकारे केलेली डेकोरेशन व आरास परिक्षकांना भुरळ घालत होते. सदर स्पर्धेचे परिक्षण राज तांबोळी,प्रा.अनुराधा एडके,डॅा.अनुश्री द्रविड,सौ.तनुजा कुलकर्णी, सौ.शीला निकम,गौरी डोके,संध्या साळवे यांनी केले. वस्ती विभागात प्रत्येकि ४ नंबर काढून एकूण २४ बक्षिसे देण्यात येणार आहेत, सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक भेट वस्तू सुंदरा मनामध्ये भरली फेम (नंदिनी) अभिनेत्री अदिती द्रविड यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती मंदार बलकवडे यांनी दिली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News