डांबरी रस्त्यावर डांबरानेच खड्डे बुजवण्याचे असतात !! मंगेश पाटील माजी.नगराध्यक्ष


डांबरी रस्त्यावर डांबरानेच खड्डे बुजवण्याचे असतात !! मंगेश पाटील  माजी.नगराध्यक्ष

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

               खरे तर डांबरी रस्त्यांवर कधीही मुरूम टाकायचाच नसतो आणि रोलिंग तर नाहीच नाही , कारण रोलिंग केले की मुरुमाची लगेच माती होती. तसेच नुसता मुरूम जरी टाकला तर सरळ आहे की त्याची वाहने / गाड्या  जाऊन माती होती  आणि पावसाळ्यात तर कधीच नाही ,कारण पाऊस पडला तर त्याचा चिखल होतो आणि मोटर सायकल व पाई चालणारे लोक सटकून पडतात व त्यांना दुखापत होते व चारचाकी गाडीने चिकल लोकांच्यावर उडतो. नंतर पाऊस गेला की , कोरडे झाले की  त्याची धूळ तयार होते आणि सर्वे गाव भर धुराडा उठतो , नाका तोंडात , डोळयांत धूळ जाते. श्वसनाचे ही आजार होतात . यांचा सर्वे वाहान चालकांना आणि विशेष करून व्यापारी आणि दुकानदारांना खूप त्रास होतो ..दुकान व त्यातील समानावर खूप धूळ बसते आणि त्यामुळे नुकसान सहन करावे लागते साफ सफाई चा खूप त्रास होतो... 

           मला हेच कळत नाही की ईतके साधे आणि सोपे आहे , नगरपालिका  खड्डे बुजवण्याचे / रिपेअर किंवा मेन्टेनन्सचे वार्षिक टेंडर काढत असते.आणि ज्याला रोड चे काम दिले त्यानें त्याचे काम झाल्यावर काही महिने किंवा वर्ष, टेंडर मधील टाकलेल्या आर्टींंन नुसार ते रिपेअर डाग डुजी करून द्यायची असते.किंवा नगरपालिकेने डांबरी रस्त्यावरील किंवा काँक्रिट रस्त्यावरील खड्डे फक्त  डांबरा ने व काँक्रेट रस्त्यावरील काँक्रेट ने बुजवण्याचे वार्षिक टेंडर काढत असते.मग हे सर्वे का नाही उन्हाळ्यात बुजवून घेतले .नवीन रस्त्या करायची वाट बघत बसत साधे खड्डे ही नाही बुजवायचे का ? जनतेला किती त्रास होतो आणि साधे नवीन रस्ते होई परियन्त डांबरी मटेरियल ने खड्डे जर बुजवले तर हा मुरूम टाकून जो त्रास जनतेला झाला तो झाला नसता.

खूप साधे सोपे असतांना किती त्रास सहनशील नागरपालिकेची पट्टी आगाऊ/आधी भरणाऱ्या कोपरगाव कारांना नगरपालिकेने द्यायचा......

जाहिरात
Search
विडिओ
Recent News