कपाशीवरील गुलाबी बोंड अळी चे एकात्मिक व्यवस्थापन !!


कपाशीवरील गुलाबी बोंड अळी चे एकात्मिक व्यवस्थापन !!

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

       कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळी हि शेतकरी बंधूंसाठी फार मोठी समस्या झाली आहे.आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जालना जळगाव बीड यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तिला सामोरे जावे लागू राहिले यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे बीटी कपाशीचे लागवडीनंतर70/75 दिवसांनी गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आधी पतंग   कपाशीच्या पानावर फुलांवर कंवर आणि कोवळ्या पानांवर अंडी घालतो अंड्यातून बाहेर पडलेल्या आळी तोंडात शिरून फुले गळतात लहान असताना या बोंडात शिरून कोवळ्या बोंडातील पूर्ण बिया खातात त्यामुळे सरकीचे नुकसान होते ही आळी जुन्या तोंडात सुद्धा शिरते आणि बोंडातील तीन-चार पाते यांचे नुकसान करते फुलावर प्रादुर्भाव झाल्यामुळं फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात, कोशावर कपासीच्या बिया आणि बोंडामध्ये पूर्ण होते त्याच्या एका बोंडामध्ये 10 ते 15 पर्यंत असू शकतात त्यामुळे रूईची प्रत बिघडते आणि सरकी तील तेलाचे प्रमाण सुद्धा कमी होते सरकीचे किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.                                        

मादी पतंग जवळपास 150 अंडी पुंजक्यामध्ये घालते ही अंडी पात्या फुले नवीन  पानाच्या खालच्या बाजूला घातली जातात अंड्यांच्या आकार 0 .5मी मी लांब आणि 0.25 मिलि रुंद असतो अंडी लांबट आणि चपटी असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत असतात

              पंधरा दिवसाचे बोंड किडीला अंडी घालण्यासाठी पसंतीचे ठिकाण असते अंडी उबविणेचा कालावधी 3 ते 6 दिवसाचा असतो अळीच्या पहिल्या दोन अवस्था पांढरट असतात आणि तिसऱ्या अवस्थेनंतर गुलाबी रंगाचा होतो अळीअवस्था 9ते14 दिवसाची असून डोके गर्द रंगाचे असते हे कोष साधारण 10 मिमी लांब बदामी रंगाचा असून ही अवस्था8 ते 12 दिवसात पूर्ण होते पूर्ण जीवनक्रम 3 ते 6 आठवड्यात पूर्ण होतो पतंग8 ते 10 मी मी तपकिरीकरड्या रंगाचे असून पंखावर काळे ठिपके असतात अशा कोषामधून सकाळच्या किंवा संध्याकाळाच्या वेळी पतंग बाहेर पडतात ते निशाचर असून दिवसा मातीमध्ये किंवा जमिनीच्या भेगांमध्ये लपून बसतात.

            हिरव्या बोंडावर दिसणारे डाग हे गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव ओळखण्याची लक्षणे आहे त्याच प्रमाणे हिरव्या बोंड आळी वर अंदाजे 1.5 ते 2 मिमी व्यासाची लहान छिद्रे असतात सेंद्रिय बोंड आळी उपस्थित असल्याचे कळते ते या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास फुले पूर्णपणे उमलत नाही ती मुरडली जातात सुरुवातीला येणाऱ्या फुलोरा अवस्थेत आणि पिकाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत उघडलेल्या बोंडावर डाग आढळल्यास गुलाबी आळी मुळे नुकसान झाल्याचे दिसून येते.

 सेंद्रिय बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढीची कारणे

   असंख्य संकरित वाण निर्माण झाल्यामुळे त्याच्या फुलोरा आणि फळधारणेच्या कालावधी वेगवेगळा असतो त्यामुळे सेंद्रिय बोंड आळी च्या एका पाठोपाठ येणाऱ्या पिढीला खाद्य पुरवठ्याचा खंड पडत नाही. तसेच

सेंद्रिय बोंड आळीने क्राय १अ.सी. आणि क्राय २

अ.बी. या दोन्ही जनुकांप्रती प्रतिकार क्षमता निर्माण केल्यामुळे ही आळी बोलगार्ड दोन कापसा वरून सुद्धा सहजपणे जगू शकते. शेतकऱ्यांनी जास्त कालावधी च्या संकरित वाणाची लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड आळीला  यजमान वनस्पती द्वारे खाद्याचा जास्तीत जास्त दिवस पुरवठा होतो. आगद म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये लागवड केलेल्या कापसाचा फुलोरा जून-जुलैमध्ये येणाऱ्या बोंड आळी साठी लाभदायक ठरतो.सुरुवातीला पेरलेले पीक आणि नंतरचे पीक यांच्या सलग उपलब्ध देते मुळे सेंद्रिय बोंड आळीला वर्षभर निरंतन खाद्य पुरवठा होतो आणि एका वर्षात या किडीला अनेक पिढ्या तयार होतात.

 बी.टी. कशाच्या कडेने नॉन बी.टी. कापसाच्या वाणीची आश्चर्यपिक म्हणून लागवड न केल्याने सेंद्रिय बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत झाली. 

कपाशीचे पीक नोव्हेंबर नंतर किंवा काही शेतामध्ये एप्रिल ते मे पर्यंत ठेवल्यास सेंद्रिय बोंड आळी चा निरंतर खाद्य पुरवठा होत राहतो.जिनिंग मिल आणि मार्केट यार्ड मध्ये ये कच्च्या कापसाची जास्त कालावधीसाठी साठवणूक केल्यामुळे नंतर लागवड होणाऱ्या कापसाच्या पिकासाठी शेंद्रिय बोंड आळी चे स्त्रोत स्थान म्हणून काम करते.वेळेवर आणि योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे शेंदरी बोंड आळीचा प्रादुर्भाव बी.टी.कपाशीवर वाढत आहे.

 कपाशीवरील गुलाबी बोंड आळीचे व्यवस्थापन

             १) कापूस पिकाचा हंगामा डिसेंबर-जानेवारी दरम्यानच संपुष्टात आणावा.

२) पूर्वहंगामी एप्रिल-मे कापसाची लागवड टाळावी.

३) अर्धवट उमलेली प्रादुर्भावग्रस्त बोंड व पिकाचे अवशेष त्वरित नष्ट करावे.

४) बीटी बियाणे सोबत गैर बीटीचे बियाणे दिले असल्यास त्याची आश्रय पीक म्हणून लागवड करावी.

५) गुलाबी बोंड आळी ने प्रादुर्भावग्रस्त कापसाची गोदामा यामध्ये साठवण करू नये.

६)संकरित बीटी सरळ वाणाचे बियाणे नेहमी अधिकृत्य विक्रित्याच्याकडूनच खरेदी करावे व दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे.

७) शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्की होणारे बीटी कापूस अथवा सरळ वाहनाची वेळेतच म्हणजे जून  महिन्यात पेरणी करावी.

८) गुलाबी बोंड आळी चा जीवनक्रम खंडित करण्यासाठी पिकाची फेरपालट करावी.

९)पतंगाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पेरणीच्या 45 दिवसानंतर हेक्‍टर 10प्रमाणे कामगंध सापळे लावावेत.

१०) कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळी च्या प्रार्दुभाव चे निदान करण्यासाठी पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत वेळोवेळी निरीक्षण करावे.

११)बोंडे लागण्याच्या अवस्थेत एक एकर क्षेत्रातून वेगवेगळ्या झाडांची 20 बोंडे तोडून ती फोडून पहावीत.

१२)खाली गळून पडलेल्या प्रादुर्भावग्रस्त पात्या फुले व बोंडे गोळा करून त्वरित नष्ट करावीत लागवडीच्या 60 दिवसानंतर निंबोळी अर्क 5% प्लस नीम तेल पाच मिलि प्रति लिटर याप्रमाणे एक फवारणी करावी.

१३) ज्या ठिकाणी उपलब्धता असेल तिथे ट्रायकोग्रामा ब‌क्टी या गुलाबी बोंड आळी च्या अंड्यावर उपजीविका करणारा परोपजीवी मित्रकीटक 60000 प्रति एकर याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने कपाशीच्या फुलोरा अवस्थेत प्रसारण केल्यास चांगले नियंत्रण मिळते.

१४) मान्यता असलेल्या व शिफारस केलेल्या किटकनाशकांची फवारणी करावी जहाल विषारी किंवा उच्च विषारी गटातील कीटकनाशकांची फवारणी टाळावी.

१५) कीटकनाशकाच्या मिश्रणाचा काटेकोरपणे वापर टाळावा.

१६) पिकाचा कालावधी वाढवणारी कीटकनाशके जसे की असिफेट चा वापर सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये टाळावा.

१७)पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ग भाव टाळण्यासाठी नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही प्रकारच्या सिंथेटिक पायरेथोइड फिप्रोनिल इत्यादी कीटकनाशकांचा वापर करू नये.

१८)आर्थिक नुकसान पातळी (आठ पतंग प्रति कामगंध सापळा प्रतिदिन सतत तीन दिवस किंवा एक अळी प्रतिदहा फुले किंवा एक अळी प्रति दहा हिरवी बोंडे) ओलांडल्यास खालील तक्त्यात दिलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा गरजेनुसार वापर करावा.

१९) स्वच्छ व निरोगी कापसाची स्वतंत्र व्यसनी करून विक्री अवस्था योग्य साठवणूक करावी तसेच कीडग्रस्त कापूस त्वरित नष्ट करावे.

२०) सूतगिरणी जिनिंग मिल मध्ये साठवलेल्या कीड ग्रस्त कापसात सुप्त अवस्थेत असलेल्या काळापासून निघणाऱ्या पतंगांना पकडण्यासाठी त्या परिसरात कामगंध अथवा प्रकाश सापळे लावावेत व जमा झालेले पतंग नष्ट करावेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News