शिवाजीनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात 700 बेरोजगारांना नोकरी मिळाल्या----


शिवाजीनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात 700 बेरोजगारांना नोकरी मिळाल्या----

 पुणे--दि--13 सप्टेंबर --- शिवाजीनगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना काळात नोकरी गमावलेल्या बेरोजगार तरुण तरुणीसाठी रविवारी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला या महोत्सवात1340 युवक--युवकांनी नावे नोंदवली होती त्यापैकी 700 जणांना विविध कंपनी मध्ये नोकरी मिळाली नोकरी चे अपॉइंटमेंट पत्र हाती पडताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता लॉक डॉउन मुळे गेली 2 वर्षे ते घरीच बसून होते नोकरी साठी वणवण करूनही नोकरी मिळत नव्हती त्यामुळे ते निराश झाले होते पण राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महोत्सवात नोकरी मिळाली त्यामुळे खुश होते  आता पोटापाण्याचा प्रश्न सुटला याचा त्यांना आनंद झाला होता---

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी शिवाजी नगर एस टी स्टँड समोरील भारत इंग्लिश स्कुल मध्ये आयोजित केलेल्या या महोत्सवाचे उदघाटन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ  प्रवक्ते अंकुश काकडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, नूतन प्रवक्ते प्रदीप देशमुख, पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मृणालिनी वाणी , युवक अध्यक्ष महेश हांडे आदी मान्यवर उपस्थित होते-- शिवाजी नगर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उदय महाले, स्थायी समितीचे  माजी अध्यक्ष  बाळासाहेब बोडके, माजी सभागृह नेते निलेश निकम, ऍड ए डी खुणे पाटील, माजी नगरसेवक आशा साने, मंगला पवार यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते याप्रसंगी नूतन पदाधिकारी चा खास सन्मान करण्यात आला--यावेळी बोलताना खासदार चव्हाण म्हणाल्या की, मोदी सरकारने 2 कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे जाहिर  घोषणा केली पण त्यांनी उद्योगपती अदानी व अंबानी यांचाच विकास केला युवकांना मात्र फसवले--- त्या पुढे म्हणाल्या की शिवाजी नगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 7--8 नगरसेवक निवडुन आणण्यासाठी आम्ही खास प्रयत्न करणार आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News