शाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली पाचशे पारधी समाजाच्या व्यक्तींचा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आरपीआय पक्षात जाहीर प्रवेश


शाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली पाचशे पारधी समाजाच्या व्यक्तींचा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आरपीआय पक्षात जाहीर प्रवेश

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - दिनांक १२ रोजी आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आदिवासी भटके जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो महिला व पुरुषांनी कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात आर पी आय मधे जाहीर प्रवेश केला. 


    यावेळी बोलताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की  पारधी समाजाला यापुढे समाजात एक आदर्श घटक म्हणून पाहण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहायला पाहिजे. त्यामुळे समाजाची एकीच त्याचे प्रतिनिधित्व करीत असते. त्यामुळे आता पोलिसांच्या साठी खबरीगिरी बंद करा आणि समाज जागृत करून व्यवसाय उभारून त्यांचा विकास साधा. शाम भोसले सारखी व्यक्ती फार क्वचितच एखाद्या समाजात तयार होत असतात. त्याला सर्वांनी साथ द्या असे आवाहन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केले.  यावेळी ठाण्याचे विभागप्रमुख विनोद भालेराव, कर्जत आरपीआयचे तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, तालुका उपाध्यक्ष सुभाष साळवे, आरपीआय युवकचे तालुकाध्यक्ष भीमराव साळवे, ॲड. पी.वी.कोपनर, शरद आढाव, सोहन कदम, सागर कांबळे, लखन भैलुमे,  रोहिदास आढाव, रमेश आखाडे, धनंजय कांबळे, सचिन कांबळे, देवा खरात, विनोद थोरात,बळी कांबळे, संदीप अण्णा भैलुमे, बी जी भैलुमे, धर्मा चव्हाण,  प्रसाद भोसले आदी उपस्थित होते. भटक्या विमुक्त जाती- जमाती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यासह आरपीआयमध्ये रविवारी प्रवेश केला. 

     यावेळी पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष सुनील साळवे पुढे बोलताना म्हणाले की, शाम भोसले यांनी गाढ झोपलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी काम केले आहे. या समाजातील लोकांवर गुन्हा दाखल केल्यावर प्रथम त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यानंतर तपासात काही सिद्ध झाल्यास पोलीस प्रशासनाने अटक करावी. अशी रोखठोक भूमिका साळवे यांनी समाजा पुढे मांडली. केवळ समाज बदनाम आहे म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे यापुढे पारधी समाजावर खपवले जाणार नाही असा इशारा साळवे यांनी प्रशासनाला दिला . ते म्हणाले की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचे स्वप्न पाहिले आहे ते सत्यात उतरविण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले काम करीत आहे. त्यांना साथ देण्यासाठी सर्वानी मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. शाम भोसले यांच्या पक्ष प्रवेशासाठी मी आजची १२ तारीख का दिली होती तर केवळ समाजाची ज्यांनी आजतागायत फरफट केली आहे त्यांचे बारा वाजविण्याचे काम आता केले जाणार आहे. ज्यांनी समाजाला वेठीस धरून आपला स्वार्थ साधला त्यांचे बारा वाजवायचे आहेत. पारधी समाजाला यापुढे सर्व शासकीय सुविधा आणि लाभ देण्याचे काम तात्काळ पार पाडायचे आहे. प्रलंबित प्रश्नाना न्याय द्यायचे आहेत . समाजाला ताकद देण्याचे काम करायचे आहे. आता या पुढे पारधी समाजातील लोकांनी पोलिसांची चमचेगिरी  बंद करायची आहे असे आवाहन बोलताना समाजातील सर्वांना केले आणि शाम भोसले यांची आरपीआयच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जिल्हाध्यक्ष पदी भोसले यांची निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले . 

        यावेळी बोलताना  शाम भोसले म्हणाले की, आजचा दिवस हा कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील समाजा साठी क्रांती झाली . आजपर्यंत फक्त समाजाचा वापर करून अनेकांनी आपल्या स्वताचा स्वार्थ साधला. मात्र यापुढे आता हे चालणार नाही. आजपासून फक्त समाज सुधारण्या साठीच प्रयत्न केला जाणार असून . माझा समाज अजून अंधारातच असुन त्यांना उजेडात आणण्यासाठी मी जीवाचे रान करणार आहे. अशी ग्वाही भोसले यांनी दिली. आता संघटन हे संघटनच राहणार आहे. समाजातील लोकांना जमिनी, घरकुल, शैक्षणिक जातीचे दाखले या साठी यापुढे काम करुन प्राधान्याने प्रश्न सोडविले जाणार आहे. यासाठी आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले . आज रिपब्लिकन पक्षात आपण प्रवेश करून समाजासाठी काम करण्याचा मानस शाम भोसले यांनी व्यक्त केला. आज समाज एकत्र आला याचे मला समाधान आहे . यापुढे समाजावरील कोणताही अन्याय कदापी सहन करणार नाही. आता आपल्या मदतीला आरपीआय आहे. असा विश्वास उपस्थित समाजाला दिला. शाम भोसले यांच्यासह कर्जत, जामखेड व श्रीगोंदा तालुक्यातील आदीवाशी भटके विमुक्त जाती जमातीचे शेकडो कार्यकर्त्यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने अनिल भोसले, शोभराज काळे, श्रीकांत भोसले, आयमन काळे, नुरा भोसले, ज्योती भोसले, चेतन भोसले, धनंजय काळे, राजुर चव्हाण, विलास काळे, शुभम भोसले, सुभाष काळे यांनी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आरपीआय पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरपीआयचे युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे यांनी केले तर तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी आभार मानले. 

     यावेळी सीमा भोसले, चंपा पवार, आश्विनी पवार, रोहिणी काळे, पार्वती भोसले, शैला काळे, भाग्यश्री काळे, नेहा काळे, बंटी भोसले, मात्री काळे, बंडू काळे, आदी महिलांनी समाजाच्या विविध अडचणी आणि समस्या उपस्थितासमोर व्यक्त केल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News