कृषी पदवीधर शेतीतून महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल....


कृषी पदवीधर शेतीतून  महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल....

श्रीगोंदा :- अंकुश तुपे  प्रतिनिधी

रायतळे (ता- पारनेर जि-अहमदनगर ) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,  अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषीदूत गणेश भानुदास जगदाळे यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व औदयोगीक कार्यानुभव कार्यक्रम डॉ. एच. पी. सोनवणे व केंद्रप्रमुख डॉ. आर. ए. कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौ-यादरम्यान आदर्श फुल शेती उत्पादकाची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला.                                              


       रायतळे येथील तरुण शेतकरी अर्जुन माधव साबळे यांनी कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना शिक्षणा ची आणि अनुभवाची सांगड घालत फुलशेतीकडे वळाले.


        नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर सतत पडणारा दुष्काळ दिसतो. परंतु पाण्याचे योग्य नियोजन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग यांची सांगड घालून अर्जुन साबळे यांनी आपल्या शेतात वीस गुंठे पॉलिहाऊसची उभारणी करून आधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करून गुलाब  शेती करतआहे. सतत पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी अर्जुन यांनी एक एकरावरती सिमेंट काँक्रीटचे शेततळे तयार केले आहे. शेततळ्यात पाणी साठा असल्यामुळे दुष्काळावर सहज मात करता येते. अर्जुन यांचे वडील व चुलते सरकारी नोकरीत असल्यामुळे शेतीचा सारा भार स्वतःवरती घेतला . कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय काढत तसेच आधुनिक तंत्राची माहिती असल्यामुळे अर्जुन यांनी अर्धा एकर पॉली हाउस मध्ये तीन वर्षापूर्वी डज गुलाब (टॉप सिक्रेट)या जातीची गुलाबाची लागवड केली. बाजारपेठ जवळ असल्यामुळे अर्जुन हे बाजाराची मागणी नुसार  फुले पोहच करतात. यातून त्यांना रोख रक्कम मिळते. अर्जुन गुलाब  या पिकातून दर महिन्याला एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळवतात.  तसेच अर्जुन यांची पाच एकरावरती डाळिंबाची शेती आहे. त्यांनी या वर्षी डाळिंबातून पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. 

          अर्जुन हे रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांचाही वापर मोठ्या प्रमाणात करतात. तसेच शेतीसाठी अर्जुन देशी जातीच्या गायीचे संगोपन करतात. यावेळी माधव साबळे , सुभाष  साबळे,  प्रशांत सांगळे व इतर शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News