केडगाव मधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता


केडगाव मधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) वडिलांचा शर्ट शिवुन आणते.तसेच येताना दुध घेऊन येते असे म्हणून घराबाहेर गेलेली 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी सायंकाळी घराबाहेर गेली ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना नगर पुणे रोड वरील केडगाव येथील शाहूनगर येथे गुरुवारी (दिं.9) घडली.

     या बाबतची माहिती अशी की रिक्षचालक अशोक हनुमंत खरात ( वय 36, रा. शाहूनगर मुळे कॉलनी येथे धुले सर यांचे खोलीत केडगाव अ.नगर ) यांची मुलगी गौरी खरात  ही अंबिका विदयालय, केडगाव अहमदनगर येथे इयत्ता 7 वी मध्ये शिक्षण घेत आहे. गुरुवारी अशोक खरात यांचा शर्ट फाटलेला असल्याने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गौरी तिच्या वडिलांना म्हणाली मी तुमच्या शर्टला शिवून आणते तसेच दुध घेवून येते असे सांगुन ती फाटलेला शर्ट घेवुन सोनवणे यांचेकडे निघून गेली. सायंकाळी .04.30 वाजेच्या सुमारास गौरी हि घरी परत आली नाही म्हणुन खरात यांच्या पत्नीने सोनवणे  यांचे घरी जावून मुलगी गौरी हिच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, गौरी ही आमचेकडे कपडे घेवून आली नाही. त्यामुळे गौरी हिचा आजुबाजुला तसेच इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती अदयाप पर्यंत मिळुन आली नाही. तिचे वर्णन- वय 13 वर्षे उंची 4.5. वर्ण सावळा, केस-काळे, कानात सोन्यांचे डूल, नाक-सरळ, अंगात- नेसणीस पिवळा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, अशा वर्णणाची  मुलगी गौरी हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्यांची खात्री झाल्याने  कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कायदेशिर रखवालीतून पळवून नेले आहे. अशी अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद दिली याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध भादवि कलम 363 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे करीत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News