स्वराज्य ध्वज यात्रेचा कर्जत मधुन दिमाखदार शुभारंभ


स्वराज्य ध्वज यात्रेचा कर्जत मधुन दिमाखदार शुभारंभ

मतदार संघातील खर्डा येथे आ रोहित पवार उभारणार जगातील सर्वांत उंच ध्वज 

जाहीरात

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - ९ सप्टेंबर: कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज  यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील   श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेक करून ध्वजाचे पूजन केले.या पूजनानंतर स्वराज्यध्वज यात्रेस सुरूवात करण्यात आली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. 


भगव्या ध्वजावरून विविध राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या ओढाताणीच्या राजकारणात राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी स्वराज्याचा भगवा ध्वज    आपल्या खांद्यावर घेतला असून  महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, व देशाच्या ६ राज्यातील ७४ प्रेरणास्थळे असा महत्वाकांक्षी प्रवास या ध्वजाचा होणार असून  दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना मतदार संघातील खर्डा येथे करण्यात येणार आहे. हा ध्वज ७४ मीटर उंचीचा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज म्हणून याची गणना होणार आहे.


सद्गुरू गोदड महाराज मंदिरातील या पूजेनंतर स्वराज्यध्वजाची पूर्ण कर्जत शहरात परिक्रमा करण्यात आली.

स्वराज्यध्वज हा स्वराज्याचा, सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली .  हि ध्वज यात्रा पुढील ३७ दिवस चालणार आहे, असं यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.


निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघातील  शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला होय . या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ फडकत राहणार  असून देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा व शौर्याचं प्रतिक असलेला भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे.


पुष्पवर्षावाने सुरूवात झालेल्या स्वराज्यध्वज यात्रेचं आज ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या स्वराज्य ध्वज यात्रेच्या पूजन कार्यक्रमात तसेच परिक्रमेत अश्वारूढ पथक, गज नृत्य, ढोलताशा पथक, हलगी व संबळ वादक, कलशधारी महिलांचाही सहभाग मोठा होता. याप्रसंगी महाविकास आघाडीचे बाळासाहेब साळुंके, प्रविण घुले, राजेंद्र गुंड, प्रसाद ढोकरीकर, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, सुनील शेलार, सचिन घुले, नितीन धांडे, विशाल मेहेत्रे, सतीष पाटील, ऋषिकेश धांडे, मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवावर्ग आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 - आजच्या या स्वराज्य ध्वज मिरवणुकीत हजारो लोकांची तुफान गर्दी झालेली होती. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे उल्लंघना कडे प्रशासनाने मात्र पुर्णपणे डोळेझाक केली. तर माजी मंत्री राम शिंदे यांनी प्रशासनाकडे कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News