तुळजा एनर्जी सोल्युशन व फायनान्स च्या रक्तदान शिबिराचे आयोजन


तुळजा एनर्जी सोल्युशन व फायनान्स च्या रक्तदान शिबिराचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी /राजेंद्र तासकर

कोपरगाव येथील तुळजा एनर्जी व तुळजा फायनान्स च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तुळजा एनर्जी सोल्युशन चे हर्षल डाके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

जाहीरात


आपल्या पत्रकात डाके पुढे म्हणाले की अपघात समयी रक्ताची आवश्यकता भासते मात्र प्रत्येकाच्या शरीरात रक्त असून देखील आपण ऐन वेळी रक्त देऊ शकत नाही असा अनुभव मागील काही दिवसांपूर्वी आला त्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून रविवार दि १२/९/२०२१ रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता डॉ आढाव हॉस्पिटल छत्रपती संभाजी महाराज चौक येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून कोपरगाव शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त रक्त दात्यांनी या रक्त दान शिबीरात सहभाग घेऊन कोणाच्या तरी आयुष्याला सावरण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन हर्षल डाके व इरफान पठाण यांनी केले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News