आता पुण्यात उभा राहणार आय आय एम नागपूरचा उप-परिसर


आता पुण्यात उभा राहणार आय आय एम नागपूरचा उप-परिसर

सप्टेंबर ७, २०२१ | पुणे:

जाहीरात


व्यवस्थापकीय संकल्पनांची उत्कृष्ट जाण असलेले, जागतिक दर्जाचे व मुल्यांची कदर असणारे व्यवस्थापक आणि उद्योजक निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने, राष्ट्रीय मान्यताप्राप्त "आय आय एम, नागपूर" (IIM Nagpur) ही संस्था सहा वर्षापूर्वी नागपूरला स्थापन झाली. गेल्या सहा वर्षात या संस्थेने व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण आणि त्यात उद्योग जगताचे सहकार्य व सहभाग मिळवण्याच्या दृष्टीने लक्षणीय कामगिरी केलेली आहे.

आता या संस्थेचा एक उप-परिसर पुण्याला उभा राहात असल्यामुळे पुणे क्षेत्रातील विद्यर्थ्यांना, अभ्यासकांना उद्योग क्षेत्राचे आकर्षण वाटेल आणि उद्योग क्षेत्रात काही विशेष करू इच्छिणाऱ्यांना आपली उद्दिष्टे साध्य करायला हुरूप येईल. आता पर्यंतच्या छोट्याश्या वाटचालीत या संस्थेने दोन वर्षांचा एक आगळा वेगळा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यासक्रम आखण्याची कामगिरी केली आहे. या अभ्यासक्रमाचे प्रचंड आकर्षण आज भारतातल्या एमबीएचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वाट आहे. आज उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष व्यवस्थापकीय दर्जाचे काम करणाऱ्यांसाठी व्यवस्थापन शास्त्राचा, विशिष्ट उद्योगाशी निगडीत असा एमबीएचा अभ्यासक्रम तयार करण्याचे उद्दिष्टही संस्थेच्या डोळ्यासमोर आहे. त्याचप्रमाणे नव्याने उद्योग उभा करणाऱ्यांसाठी व अगदी नव्या बाल्यावस्थेतील उद्योगांच्या चालकांसाठी इनफेड (InFed- An Incubation Centre for Aspiring Entrepreneurs and Early-stage Start-ups) हा एक अत्यंत अभिनव असा उपयुक्त व काटेकोरपणे आखलेला अभ्यासक्रम या संस्थेने सुरु केलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या आखणीसाठी शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांकडून मार्गदर्शन तर घेतले आहे. पुण्यातील या प्रकल्पाचा प्रारंभ म्हणून पुण्याच्या औद्योगिक जगतातील मान्यवरांशी आणि तज्ज्ञांशी ७सप्टेंबर रोजी चर्चा आयोजित केली आहे. अंशीहून अधिक उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींनी या चर्चेत भाग घेऊन त्यांच्या अनुभव संपन्न, उत्तमसूचना केलेल्या आहेत. यातूनच उभयपक्षी उपयुक्त असे ऋणानुबंध निर्माण होतील. या प्रसंगी "आय आय एम, नागपूर" च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि टेक महिंद्राचे एम डी आणि सी ई ओ श्री. सी. पी. गुरनानी म्हणाले, ”आज येथे पुण्यात आयआयएम नागपूरचे "सॅटेलाईट कॅम्पस" सुरू करण्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. अतिशय वेगवान, लवचिक आणि डायनॅमिक उद्योगाचे चित्र तयार करण्यास इच्छूक असलेल्या भविष्यातील युवा नेतृत्वांची इकोसिस्टीम तयार करून एक आदर्श प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पुण्यातील हे "सॅटेलाईट कॅम्पस" व्यवस्थापनाच्या क्षेत्रात नव्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. हे कॅम्पस उद्योगांतील नेतृत्व आणि शैक्षणिक क्षेत्राला एकत्र आणून जागतिक दर्जाचे शिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करणारे ठरणार आहे. हे "उद्याचे नेतृत्व' घडवविणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.” सीआयआरटी आपल्या 108 एकरच्या कॅम्पसमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आयआयएम नागपूरला अभ्यासक्रम आणि संबंधित कार्य/ उपक्रम चालवण्यासाठी त्याची मदत होणार आहे. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी या संवादादरम्यान पुणे परिसरातील योजनांची उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले, नागपूरच्या आयआयएमचे पुण्यात "सॅटेलाईट कॅम्पस" सुरू होणे, हा या संस्थेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे." याठिकाणी सुरू होणारे अभ्यासक्रम लघु आणि दीर्घ कालावधीचे एक्झेक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम्स आणि कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी एमबीए अशा स्वरूपाचे राहतील. संशोधन आणि सल्लागारांचा सहयोग हे देखील या अभ्यासक्रमांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य राहणार आहे.

व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर परिणाम साधणे, हा आयआयएम नागपूरच्या मिशनचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आयआयएम नागपूरचे पुणे येथे "सॅटेलाईट कॅम्पस" सुरू होणे, हे या दिशेने

पडलेले एक मोठे पाऊल आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News