दौंड शहरात सणासुदीच्या काळात रस्त्याची कामे करण्याची परंपरा कायम,रस्ते विभाग आणि दौंड प्रशासनाचे दौंड करांकडून हार्दिक आभार


दौंड शहरात सणासुदीच्या काळात रस्त्याची कामे करण्याची परंपरा कायम,रस्ते विभाग आणि दौंड प्रशासनाचे दौंड करांकडून हार्दिक आभार

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

जाहिरात


दौंड शहरात मागील काही वर्षा पासून रस्त्याची कामे संथगतीने सुरू आहेत काही रस्ते वादात आहेत,काही रस्त्यांसाठी जनआंदोलन झाले परंतू पूर्ण रस्ता दौंड कराना आतापर्यंत मिळाला नाही हे दौंड करांचे दुर्दैव आहे, रस्त्याची कामे,आणि कोरोना महामारी यामुळे दौंड शहरात व्यवसायांना उतरती कळा लागली आहे, आता गणेशोत्सव सुरू होत आहेत,थोडेफार  व्यवसाय होतील अशी अपेक्षा असतानाच दोन दिवस अगोदर दौंड शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला आहे,या रस्त्याला अजून एक वर्ष पूर्ण झाले नाही तोपर्यंत च पॅच मारायला सुरुवात झाली आहे, परंतु अगदी सणासुदीला हे काम हाती घेण्यात आले आहे, दौंड शहरातील हुतात्मा चौक येथे मुख्य रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला आहे, ज्या रस्त्यावर गणेश भक्त गणेश मूर्ती तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येतात, तसेच सर्वच गणेश मंडळ,घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी याच रस्त्यावरून जात असतात तेथे खोदून ठेवले आहे, गणेश भक्त यामुळे नाराज झाले आहेत, खड्डा का खोदला,कश्यासाठी खोदला याच्या खोलवर जनतेला जायचे नाही परंतु व्यवसाय मंदी आहे आणि सणासुदीच्या काळात रस्ता खोदल्या मुळे व्यवसायावर नक्कीच परिणाम होणार आहे, अशा अडमुठ कारभारामुळे व्यवसायिकांचे मात्र हाल होत आहेत, आणि सणासुदीच्या काळात दौंड शहरात रस्त्याची कामे करण्याची परंपरा कायम राखल्यामुळे दौंडकरानी रस्तेविभाग आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News