माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कडूस यांचे स्वागत .. शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांबाबत चर्चा


माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कडूस यांचे स्वागत .. शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांबाबत चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- जिल्हा परिषदेचे नुतन माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकेतर प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष भिमाशंकर तोरडमल, उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, सचिव भानुदास दळवी, सहसचिव पै. नाना डोंगरे, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडूळे, संदीप पानमळकर, विलास नागरे, गोरक्ष शिंदे, ज्ञानदेव शिंगोटे, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी सेवा दाखले, मेडिकल बील, पीएफच्या पावत्या व 20 व 40 टक्क्यांवरील अनुदान मिळण्यासंदर्भात व इतर शिक्षकेतर प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली. नुतन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी बाबत आढावा घेऊन सकारात्म पध्दतीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News