कर्जत नगरपंचायत आणि कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यावरण पूरक गणेश स्पर्धेचे आयोजन


कर्जत नगरपंचायत आणि कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यावरण पूरक गणेश स्पर्धेचे आयोजन

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - पर्यावरण पुरक गणपती बाप्पाची मूर्ती ही काळाची गरज असून सर्वानी ती अंगीकारली पाहिजे. जेणेकरून भविष्यात पर्यावरण शुद्ध राखण्यास मदत मिळेल. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. कर्जत नगरपंचायतीचा "पर्यावरण पूरक गणेश स्पर्धा" हा उपक्रम माझी वसुंधरा अभियानातंर्गत राबविण्यात येत आहे. तरी सर्वानी यामध्ये सहभाग घेऊन  पर्यावरणासाठी कर्जतची जनता जागृत असल्याची जाणीव निर्माण करू असे प्रतिपादन कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले. ते पर्यावरण पूरक गणेश कार्यशाळानिम्मित बोलत होते. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, खजिनदार मुन्ना पठाण, डॉ अफरोज पठाण, व नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.

             पर्यावरण पूरक गणेश स्पर्धा कर्जत नगरपंचायतीने आयोजित केली असून . यामध्ये शाडूची माती, लाल किंवा काळी माती या पासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारावी आणि तिची स्थापना करावी हा हेतू ठेवत बुधवारी या निम्मित नगरपंचायत व कर्जत तालुका पत्रकार संघाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  कर्जत नगरपंचायत कार्यलयात  तालुका पत्रकार संघ आणि कर्जत नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी कार्यशाळेत मातीपासून श्रींची  मनमोहक मूर्ती साकारली होती. यामध्ये वसंत साठे, संतोष समुद्र, अभियंता रवींद्र गलांडे, महेश पाचोरे, जोशी मॅडम, भालेराव मॅडम, नितीन गलांडे, अशोक मोहोळकर यांच्यासह पत्रकार मुन्ना पठाण आदींनी सहभाग घेतला होता. या प्रकारच्या पर्यावरण पुरक शाडूच्या किंवा मातीपासून गणपतीच्या मुर्ती तयार करण्याचे काम दादा पाटील महाविद्यालयातील एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी तसेच कोटा मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. 

 - माझी वसुंधरा दोन अभियानातंर्गत कर्जत शहरात पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धेत कर्जतकरानी सहभाग नोंदवून  नगरपंचायतीद्वारे पर्यावरण पूरक श्रींची मूर्ती अवघ्या ५० रुपयात उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमात श्रींची प्रतीस्थापना करीत त्याचे विसर्जन घरातील कुंडीत  करून त्याचे स्मरण म्हणून त्याच कुंडीत एक झाड अथवा देशी रोप लावायचे असुन त्या झाडाचे संगोपन करताना दर महिन्याला जियोटॅग सह नगरपंचायतीच्या व्हाट्सअप क्रमांकावर त्या झाडाचे फोटो सेंड करायचे आहेत . ज्या महिलांनी झाडांचे चांगले संगोपन केले आहे त्या पैकी संक्रातीच्या दिवशी ५१ महिलांना लकी ड्रॉचे माध्यमातून ५१ पैठणींचे वाटप नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News